Shimla Mosque Controversy : शिमला (हिमाचल प्रदेश) येथे बेकायदेशीर मशीद पाडण्‍यासाठी हिंदूंनी काढला मोर्चा !

मशिदीसमोर हिंदूंचे धरणे आंदोलन

शिमला (हिमाचल प्रदेश) – शहरातील संजौली परिसरातील बकायदेशीर मशिदीवरून स्‍थानिक लोकांनी एकजूट होऊन तेथील बाजारपेठेत निषेध मोर्चा काढला. या वेळी त्‍यांनी बेकायदेशीर मशीद पाडण्‍याची मागणी केली. त्‍यांनी मशिदीसमोर बसून धरणे आंदोलन केले. या वेळी लोकांनी हनुमान चालिसाचे पठण केले आणि भजनही गायले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आणि जिल्‍हाधिकारी घटनास्‍थळी पोचले आणि त्‍यांनी लोकांशी चर्चा केली.

मिळालेल्‍या माहितीनुसार संजौलीमध्‍ये एका मशिदीच्‍या वर ३ मजले बेकायदेशीररित्‍या बांधण्‍यात आले आहेत. शिमला महापालिकेचे आयुक्‍त भूपेंद्र अत्री यांनी सांगितले की, येथे केवळ एक मजला बांधण्‍यास अनुमती देण्‍यात आली होती. इतर तीन मजले बेकायदेशीर आहेत. या प्रकरणाची लवकरच न्‍यायालयात सुनावणी होणार असून कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

मुसलमानाने केलेल्‍या आक्रमणाच्‍या विरोधात आंदोलन

काही दिवसांपूर्वी शिमल्‍याच्‍या मल्‍याना गावात हिंदु आणि मुसलमान यांच्‍यामध्‍ये भांडण झाले होते. या वेळी मुसलमान समुदायातील एका व्‍यक्‍तीने स्‍थानिक दुकानदार यशपाल सिंह यांच्‍यावर आक्रमण केले होते. या आक्रमणात यशपाल सिंह याच्‍या डोक्‍याला मार लागला आणि त्‍याच्‍या डोक्‍याला १४ टाके पडले होते. मुसलमानाने यशपाल सिंह याच्‍या हत्‍येचा प्रयत्न केल्‍याचा आरोप करत स्‍थानिक लोकांनी आंदोलन केले होते. (अल्‍पसंख्‍याक मुसलमानांकडून बहुसंख्‍य असलेले हिंदू मार खातात. काळाच्‍या ओघात टिकायचे असल्‍यास हिंदूंनी संघटित झाले पाहिजे ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

असा मोर्चा काढण्‍याची वेळ हिंदूंवर का येते ? बेकायदेशीर मशिदीचे बांधकाम होत असतांना प्रशासन झोपले होते का ?