कर्णावती (गुजरात) – भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर गुजरातमधील पोरबंदर येथे कोसळले. यातील ४ पैकी ३ जण बेपत्ता असून एकाला वाचवण्यात आले. हे हेलिकॉप्टर पोरबंदर किनार्यापासून ४५ कि.मी. अंतरावर असणार्या एका नौकेतील घायाळ कामगाराला आणण्यासाठी गेले होते. त्या वेळी ते समुद्रात कोसळले. या घटनेनंतर साहाय्यता कार्य करण्यासाठी तटरक्षक दलाने ४ नौका आणि २ विमाने पाठवली आहेत.