पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्या इजिप्त दौर्‍यावर !

द्विपक्षीय व्यापाराच्या संदर्भात मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह एल सिसी यावर्षीच्या भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते.

रशियामध्ये ‘वॅगनर ग्रुप’ सैन्याची बंडखोरी

या सैन्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोजीन यांनी ‘आम्ही मॉस्कोकडे मार्गस्थ करत आहोत. आमच्या मार्गात येणार्‍यांना धडा शिकवण्यात येईल’, अशी चेतावणी दिली आहे.

प्रसिद्ध हॉलिवूड गायिका मेरी मिलबेन यांनी गायले भारताचे राष्ट्रगीत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४ दिवसांचा अमेरिका दौरा समाप्त झाला असून ते आता इजिप्तच्या दौर्‍यावर गेले आहेत. तत्पूर्वी अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांनी रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये अनिवासी भारतियांना संबोधित केले.

आषाढी एकादशीला पंढरपूर मंदिरात लोकप्रतिनिधींसाठीचे ‘व्ही.आय्.पी.’ दर्शन बंद !

‘अतीमहनीय असणे’ हा देवाच्या दर्शनासाठीचा निकष नको, तर ‘भक्त असणे’, हा निकष हवा !

महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत १ सहस्र ९०० रोगांवर उपचार होणार !

केंद्र आणि राज्य शासनाची योजना एकत्रित केल्याने केंद्रशासनाचा मोठा निधी राज्याला मिळेल आणि राज्य सरकारचा आर्थिकभारही न्यून होईल.

सिंधुदुर्ग : कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी उपोषणाची चेतावणी

अशी चेतावणी का द्यावी लागते ?

गोवा : कारवाईनंतर कह्यात घेतलेल्या मद्याच्या बाटल्यांची काळ्या बाजारात विक्री !

अनुज्ञप्ती घोटाळ्यास उत्तरदायी असलेला खात्यातील एक वरिष्ठ कारकूनच या नव्याने उघडकीस आलेल्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. या विक्रीतून मिळणारा पैसा संबंधित वरिष्ठ कारकून अबकारी निरीक्षकालाही देत होता.

रुमडामळ (गोवा) पंचायत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कायद्यानुसार चालते ! – पंच विनायक वळवईकर यांचा आरोप

मुसलमान बहुसंख्य झाले आणि त्यात धर्मांध मुसलमानांचा सहभाग असला की, हिंदूंची काय स्थिती होते पहा ! यासाठीच भारतात हिंदु राष्ट्र हवे ! कारण हिंदु बहुसंख्येने निवडून आले, तरी ते धर्मनिरपेक्ष राहतात आणि मुसलमान पंचसदस्याला सामावूनही घेतात.

चंद्रपूर येथे ७ वर्षांच्‍या मुलाच्‍या आधारकार्डवर उपमुख्‍यमंत्र्यांचे छायाचित्र !

संबंधित मुलाच्‍या कुटुंबियांनी हे छायाचित्र पालटून घेण्‍यासाठी आधार केंद्रात संपर्क साधला. त्‍यानंतर प्रशासनाने चूक दुरुस्‍त केली, तसेच अशी चूक करणार्‍या एजन्‍सीची चौकशी करून कारवाई करणार असल्‍याचेही सांगितले जात आहे. 

गोरक्षकांमुळे वैराग (सोलापूर) येथे ४३ गोवंशियांना कत्तलीपासून जीवदान !

सगळा गोवंश अहिंसा गोशाळेत उतरवण्‍यात आला. ही कारवाई यशस्‍वी करण्‍यासाठी वैराग पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, तसेच सुधीर भाऊ बहिरवाडे, हृषिकेश कामथे, अक्षय कांचन, राहुल कदम, अखिल भारत कृषी गोसेवा संघ सोलापूरचे शहर संघटक प्रसाद झेंडगे, अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे धाराशिव प्रमुख रोहित बागल, तुळजापूरचे गोरक्षक अर्जुन देशमुख आदींचे सहकार्य लाभले.