पहिने (जिल्‍हा नाशिक) येथील इंग्रजी शाळेच्‍या वसतीगृहातील मुलींना रात्री पर्यटकांसमोर नाचवले !

जिल्‍ह्यातील त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यात एका वसतीगृहातील अल्‍पवयीन मुलींना सायंकाळी आणि रात्री पर्यटकांंसमोर नाचवण्‍यात आले. या प्रकरणी संस्‍थेचे चालक आणि शिक्षिका यांच्‍याविरुद्ध वाडीवर्‍हे पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील पहिने येथे ही घटना घडली आहे.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट करणारे वास्तव !

‘चांगली बातमी आहे’, असा एक दिवस तरी हिंदू आणि भारत यांच्यासाठी आहे का ?’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सांगली येथे व्यावसायिकाच्या बंगल्यावर ‘ईडी’ची धाड !

आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. या अन्वेषणाची कोणतीही अधिकृत माहिती देण्यास ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी नकार दिला आहे.

शिवणी (जिल्‍हा नांदेड) येथे गोरक्षकांवरील आक्रमणाचा संगमनेर येथील हिंदुत्‍वनिष्‍ठांकडून निषेध !

नांदेड जिल्‍ह्यातील शिवणी येथे धर्मांधांनी केलेल्‍या आक्रमणात एका गोरक्षकाचा मृत्‍यू झाला, तसेच अन्‍य गोरक्षक गंभीर घायाळ झाले. याचा निषेध संगमनेर (जिल्‍हा अहिल्‍यानगर) येथील हिंदुत्‍वनिष्‍ठांनी करून उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांना बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषद यांच्‍या वतीने निवेदन देण्‍यात आले.

गोवंशियांची कत्तल करणार्‍या आरोपींना ३ वर्षे हद्दपार करण्‍याची बजरंग दलाची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्‍वतःहून असे निर्णय का घेत नाही ?

दिंड्यांसाठी ६५ एकरमधील प्‍लॉटची जागा निश्‍चित करण्‍यासाठी भाविकांचे निवेदन !

दिंड्यांसाठी येथील ६५ एकर मधील प्‍लॉट कायमस्‍वरूपी निश्‍चित करण्‍यात यावेत, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी आरोग्‍यमंत्री तानाजी सावंत यांना दिले.

इंदापूर (पुणे) येथे संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा रंगला !

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्‍यातील दुसरे रिंगण इंदापूरमधील कस्‍तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्‍या प्रांगणामध्‍ये पार पडले. नगारखान्या पाठोपाठ २७ दिंड्या, संत तुकाराम महाजांची पालखी, ५० हून अधिक दिंड्या रिंगण प्रांगणामध्‍ये पोचल्‍या.

माहीममध्‍ये अज्ञातांनी औरंगजेबासह प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असलेले फलक लावले !

माहीम परिसरात अज्ञातांनी उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेब यांचे वादग्रस्‍त मजकुरासह एकत्रित छायाचित्र असलेले फलक मध्‍यरात्री लावले होते. सकाळी स्‍थानिक शिवसैनिकांनी तात्‍काळ हे फलक हटवले.

झाले बहु । होतील बहु । परि यासम हा ।

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासाठी ‘झाले बहु । होतील बहु । परि यासम हा ।’ ही काव्‍यपंक्‍ती उचित ठरते. भारतात आजवर १७ पंतप्रधान होऊन गेले; परंतु एका तरी नावाचा जयघोष केला गेल्‍याचे आपण कधी पाहिले वा ऐकले आहे का ? नाही ना ! याउलट ‘मोदी’ हे नाव केवळ भारतातच नव्‍हे, तर सातासमुद्रापारही तितक्‍याच आवेशाने, उत्‍साहाने … Read more

राजस्‍थान येथील १६ व्‍या राष्‍ट्रीय योगासन स्‍पर्धेत ‘केळकर योग वर्ग मिरज’च्‍या योगपटूंचे दैदीप्‍यमान यश !

कोटा, राजस्‍थान येथे १७ आणि १८ जून या दिवशी ‘आर्ट ऑफ लर्निंग इन्‍स्‍टिट्यूट’च्‍या वतीने आयोजित १६ व्‍या राष्‍ट्रीय योगासन स्‍पर्धेत ‘केळकर योग वर्ग मिरज’च्‍या योगपटूंनी दैदीप्‍यमान यश मिळवले आहे.