पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्या इजिप्त दौर्‍यावर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्या इजिप्त दौर्‍यावर

कैरो (इजिप्त) – पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्या इजिप्त दौर्‍यावर गेले आहेत. द्विपक्षीय व्यापाराच्या संदर्भात मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह एल सिसी यावर्षीच्या भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते.

 (सौजन्य : The Indian Express)

दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये ६ मासांमधील ही दुसरी बैठक असेल. मोदी येथे भारतीय वंशाच्या लोकांना भेटणार आहेत. यासह पंतप्रधान मोदी १ सहस्र वर्षे जुन्या शिया मस्जिद अल्-हकीमलाही भेट देणार आहेत.