अमेरिकेत गर्भपाताच्या औषधासाठीची अनुमती कायम !

अमेरिकेत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशामुळे गर्भपातासाठी सामान्यपणे वापरत असलेल्या औषधांसाठीची अनुमती रहित करण्यात आली होती. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रहित करत या औषधांसाठीची अनुमती कायम ठेवली आहे.

पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

ज्याप्रमाणे हिंदुत्वाची चळवळ वाढत आहे, त्याचप्रमाणे हिंदुविरोधी कारवाया वाढत आहेत. आज देशात बहुसंख्य हिंदू असतांना आपण धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. पोलिसांच्या समक्ष ‘सर तन से जुदा’ असे गाणे वाजवले जाते.

मंदिरांच्या भूमींच्या लिलावाचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना नाही, तर पुजार्‍यांना देणार ! – शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री

जर मध्यप्रदेश सरकार असा निर्णय घेऊ शकते, तर देशातील अन्य राज्य सरकारे का घेऊ शकत नाहीत ? मध्यप्रदेश सरकारने याहीपुढे जाऊन मंदिरांचे झालेले सरकारीकरण रहित करून सर्व मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात द्यावीत !

खलिस्तानी अमृतपाल सिंह याला पंजाबमधून अटक

गेले ३६ दिवस पसार असणारा पंजाबमधील ‘वारिस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याला अखेर पोलिसांनी येथील रोडे गावातील भिंद्रानवाले गुरुद्वारातून अटक केली. हे गाव खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचे जन्मगाव आहे.

सिंधुदुर्ग : रेडी येथील यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च

एकीकडे शासन यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च करते, तर दुसरीकडे गडाच्या तटबंदीला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने अवैधरित्या उत्खनन आणि बांधकाम केले जात असतांना पुरातत्व खाते त्याकडे दुर्लक्ष करते. यात शासनाचा पैसा वाया जाणार नाही का ?

सिंधुदुर्ग : यशवंतगडाजवळ अवैध उत्खनन केल्याच्या प्रकरणी १० जणांना एकूण २६ लाख रुपये दंड !

शिवप्रेमींच्या लढ्याला प्राथमिक यश ! वेंगुर्ला तहसीलदारांची संबंधितांना नोटीस १५ दिवसांत दंड न भरल्यास सक्तीने वसूल करण्याची दिली चेतावणी !

गोवा : अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या २ प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवण्यास पोलिसांकडून टाळाटाळ

अशा पोलिसांना केवळ बडतर्फच करणे नव्हे, तर कारागृहात टाकले पाहिजे !

‘जी-२०’ शिखर परिषद : विकासात्मक कार्यगटाच्या तिसर्‍या बैठकीचे गोव्याला वेध

गोव्यात ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या या बैठकीत ‘डिजिटल प्रिन्सिपल्स’, ‘ग्रीन ट्रान्झीशन्स’ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वयक अन् सहयोग वाढवणे या दीर्घकालीन विकासात्मक सूत्रांवर प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे.

(म्हणे) ‘धार्मिक भावना दुखावल्यामुळेच हिंदूंविषयी अपमानास्पद टिपणी केली !’ – दक्षिण गोव्यातील जुळ्या मुसलमान बहिणीं

जामीन अर्जातील मुसलमान बहिणींचे हे म्हणणे कितपत खरे आहे, ते गुन्हे अन्वेषण विभागाने पडताळावे ! हे हिंदूंच्या विरोधात रचलेले षड्यंत्रही असू शकते !

राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक-शिष्य होणे केव्हाही श्रेयस्कर !

‘कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक किंवा शिष्य होणे लाखो पटींनी श्रेष्ठ असते; कारण राजकीय पक्षात गेल्यावर रज-तम गुण वाढतात, तर साधक किंवा शिष्य झाल्यास सत्त्वगुण वाढतो. त्यामुळे देवाकडे वाटचाल होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले