अमेरिकेत गर्भपाताच्या औषधासाठीची अनुमती कायम !

सर्वोच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रहित !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशामुळे गर्भपातासाठी सामान्यपणे वापरत असलेल्या औषधांसाठीची अनुमती रहित करण्यात आली होती. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रहित करत या औषधांसाठीची अनुमती कायम ठेवली आहे. ‘हा महिलांचा अधिकार असून आम्ही त्याचे रक्षण करत आहोत’, असे न्यायालयाने सांगितले.

‘डॅन्को लॅबोरेटरीज’ हे आस्थापन ‘मिफेप्रिस्टोन’ या औषधाची निर्मिती करते आणि हे औषध अमेरिकेत गर्भपातासाठी वापरले जाते. वर्ष २००० पासून गर्भपातासाठी या औषधाच्या वापरास संमती देण्यात आली असून ५० लाखांहून अधिक जणांनी त्याचा वापर केला आहे. अमेरिकेत निम्म्याहून अधिक गर्भपातांमध्ये याच औषधाचा वापर केला जातो.