पैठणबाजार (छत्रपती संभाजीनगर) समितीच्या निवडणुकीत गोंधळ !
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून गोंधळ होऊन काँग्रेसच्या २ गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. या घटनेमध्ये १ जण गंभीर घायाळ झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून गोंधळ होऊन काँग्रेसच्या २ गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. या घटनेमध्ये १ जण गंभीर घायाळ झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत
पंतप्रधान मोदी यांना जे अधिकारी अपेक्षित आहेत, तसेच केवळ अधिकारीच नव्हे, तर शासनकर्ते, पोलीस, न्यायाधीश, शिक्षक आणि शेवटी नागरिक निर्माण करण्यासाठी त्यांना साधना शिकवणे अन् ती करवून घेणे, हेच मूळ असणार आहे. हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला साधना शिकवून ती त्याच्याकडून करवून घेण्यात येईल !
अतिक्रमण हटवून आरे दुग्ध वसाहत परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ जणांची समिती स्थापन केली आहे.
जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील जिल्हा परिषद जलसंधारण कार्यालयाकडून गेल्या अनेक वर्षांपासून एका खासगी हॉटेल व्यावसायिकाला पाणीपुरवठा केला जात होता.
तिरुपती देवस्थानाच्या दर्शन तिकिटांमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणी आंध्रप्रदेशातील आमदार शेख साबजी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी ६ भक्तांकडून दर्शनासाठी ५०० रुपयांऐवजी प्रत्येकी १ लाख रुपये गोळा केले होते.
‘उष्णतेच्या विकारांवर दिवसातून ३ वेळा अर्धा चहाचा चमचा सनातन वासा (अडुळसा) चूर्ण आणि अर्धा चहाचा चमचा सनातन उशीर (वाळा) चूर्ण एकत्र करून अर्धी वाटी पाण्यात मिसळून प्यावे. असे साधारण १ ते २ आठवडे करावे.’
मंदिर व्यवस्थापनामध्ये निष्काम भक्तांऐवजी परिसरातील राजकारणी किंवा सधन व्यक्ती यांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे काही मंदिरांचे विश्वस्त आणि कर्मचारी यांना त्या मंदिरातील देवतेविषयीच श्रद्धा नसते.
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
आपत्काळात समाजाला जिवंत रहाता येण्यासाठी ग्रंथ प्रसिद्ध करणारे एकमेव द्रष्टे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
वर्ष १९८६ ते २०१७ या कालावधीत केवळ तमिळनाडूमधील मंदिरांची ४७ सहस्र एकर, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांतील २५ सहस्र एकर भूमी बेपत्ता झाली आहे.