खलिस्तानी अमृतपाल सिंह याला पंजाबमधून अटक

आसामच्या दिब्रुगड येथील कारागृहात नेले

मोगा (पंजाब) – गेले ३६ दिवस पसार असणारा पंजाबमधील ‘वारिस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याला अखेर पोलिसांनी येथील रोडे गावातील भिंद्रानवाले गुरुद्वारातून अटक केली. हे गाव खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचे जन्मगाव आहे.

सौजन्य विऑन 

अमृतपाल याला त्याच्या समर्थकांसह पोलिसांसमोर शरणागती पत्करायची होती; मात्र तत्पूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर त्याला विमानातून आसामच्या दिब्रूगड येथील कारागृहात नेण्यात आले. तेथेच त्याला ठेवण्यात येणार आहे. पंजाबच्या कारागृहात ठेवल्यास तो तेथील बंदीवानांचा बुद्धीभेद करून त्यांना खलिस्तानी कारवायांमध्ये ओढण्याची शक्यता असल्याने त्याला दूर आसाम येथील कारागृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी त्याच्या काही साथीदारांनाही दिब्रूगड येथील कारागृहातच ठेवण्यात आले आहे.