खासगी शाळांमधील शुल्क ठरवण्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त करणार ! – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

विनाअनुदानित शाळेचे शुल्क किती असावे ? हे राज्यशासन ठरवत नसल्याने विनाअनुदानित शाळांमधील शुल्काच्या संदर्भात अनेक तक्रारी राज्यशासनाकडे येत असतात. येणार्‍या काळात याविषयी स्थापन करण्यात आलेली समिती काम करेल.

लंडनमध्ये खलिस्तान्यांकडून पुन्हा उच्चायुक्तालयाबाहेर आंदोलन

सातत्याने असे हिंसक आंदोलन करणार्‍या खलिस्तान्यांवर लंडन पोलीस कठोर कारवाई का करत नाही ? कि ब्रिटन सरकारची खलिस्तानवाद्यांना फूस आहे ?

‘हिंडेनबर्ग रिसर्च’ लवकरच नवा अहवाल सादर करणार !

‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्वीट करण्यात आले आहे. ‘नवीन अहवाल लवकरच..अजून एक मोठा खुलासा’, असे या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

वर्ष २०२४ पूर्वी समान नागरी कायदा लागू करा ! – योगऋषी बाबा रामदेव यांची मागणी

रामदेवबाबा पुढे म्हणाले की, ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम चालू झाले आहे.

काश्मीरमधील प्राचीन श्री शारदादेवी मंदिराचे पुनर्निर्माणानंतर उद्घाटन  

गेली अनेक दशके हे मंदिर दयनीय स्थितीत होते.

वृक्ष लागवडीच्या कामात शासन भ्रष्टाचार सहन करणार नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वृक्षलागवड हे ईश्वरीय कार्य आहे. याविषयी अपहाराची कोणती तक्रार असेल, तर शासनाला त्याची माहिती द्या. वृक्ष लागवडीच्या कामात शासन भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २३ मार्च या दिवशी विधान परिषदेत केले.

नागपूर येथे हिंदु नववर्षानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती !

नागपूर येथे हिंदु नववर्षानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. गुढीपाडव्याविषयी माहिती देणार्‍या हस्तपत्रकाचे वितरण करण्यात आले. मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली.

नंदुरबार येथे गुढीपाडव्यानिमित्त धर्मप्रसार आणि सामूहिक गुढीपूजन पार पडले !  

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रबोधनपर भित्तीपत्रके लावणे, फलकलेखन करणे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी यांना भेटून हिंदु नववर्षच्या शुभेच्छा देणे, तसेच सामूहिक गुढी उभारणे आदी माध्यमातून धर्मप्रसार आणि प्रबोधन करण्यात आले.

मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा !

वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकातील एका जाहीर सभेत गांधी यांनी ‘सर्व चोरांची नावे ‘मोदी’ कशी काय ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता.