मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा !

राहुल गांधी

सूरत : ‘मोदी’ या आडनावावरून केलेल्या मानहानीच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत जिल्हा न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकातील एका जाहीर सभेत गांधी यांनी ‘सर्व चोरांची नावे ‘मोदी’ कशी काय ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता.


त्याविरुद्ध सुरत येथील मोदी समाजाने तीव्र आक्षेप घेत त्यांच्याविरुद्ध खटला प्रविष्ट केला होता. या प्रकरणाची १७ मार्च २०२३ ला अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने २३ मार्चला गांधी यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.


न्यायालयाकडून लगेच जामीनही संमत !

राहुल गांधी

सुरत – ‘मोदी’ या आडनावावरून केलेल्या मानहानीच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत जिल्हा न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकातील एका जाहीर सभेत गांधी यांनी ‘सर्व चोरांची नावे ‘मोदी’ कशी काय ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर सुरत येथील मोदी समाजाने तीव्र आक्षेप घेत गांधी यांच्याविरुद्ध खटला प्रविष्ट केला होता. या प्रकरणाची १७ मार्च २०२३ ला अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने २३ मार्चला गांधी यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. यानंतर त्यांना जामीनही संमत झाला. यासह गांधी यांना वरच्या न्यायालयात या शिक्षेला ३० दिवसांत आव्हान देण्याची सवलत देण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी त्यांच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. तेथे सुरत सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यास राहुल गांधी यांची खासदारकी वाचू शकते; मात्र जर स्थगिती मिळाली नाही, तर त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागेल. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, तर खासदारकी वाचू शकते अन्यथा ती रहित होईल. गांधी यांना २ वर्षे शिक्षा भोगावी लागेल आणि ते पुढची ८ वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत.

सत्य हाच माझा देव आहे ! – राहुल गांधी

न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यावर राहुल गांधी यांनी ट्वीट करून त्यांचे विचार मांडले आहेत.

यात गांधी यांनी म. गांधी यांचे पुढील वाक्य लिहिले आहे. ‘सत्य हाच माझा देव आहे आणि तो अहिंसावर आधारित आहे. सत्य हाच माझा देव आहे आणि अहिंसा त्याला मिळवण्याचे साधन आहे. – म. गांधी’