‘हिंडेनबर्ग रिसर्च’ लवकरच नवा अहवाल सादर करणार !

नवी देहली – अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ संस्थेने काही आठवड्यांपूर्वी भारतातील अदानी या उद्योग समूहाविषयी प्रसारित केलेल्या अहवालामुळे अदानी यांच्या आस्थापनांच्या समभागाचे (शेअर्सचे) मूल्य प्रचंड गतीने कोसळले होते. यामुळे उद्योगपती गौतम अदानी यांचे नाव जगभरातील श्रीमंतांच्या सूचीमध्ये असलेल्या दुसर्‍या स्थानावरून ३० व्या स्थानाच्या पुढे गेले होते.

आता हिंडेनबर्ग पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट करण्यासाठी  सज्ज झाला आहे. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्वीट करण्यात आले आहे. ‘नवीन अहवाल लवकरच..अजून एक मोठा खुलासा’, असे या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ‘हिंडेनबर्ग आता कुणाविषयी खुलासा करणार आहे ?’, यावरून चर्चा चालू झाली आहे.