|
नवी देहली – बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित मुलांची ओळख पटवण्याचा आदेश देहली महापालिकेने शाळांना दिले आहेत. याखेरीज अशा बालकांना जन्म प्रमाणपत्र देऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापालिकाने सर्व शाळा प्रमुखांना ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिकाचे उपायुक्त बी.पी. भारद्वाज म्हणाले की, महापालिका शाळांमध्ये प्रवेश देतांना बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटवण्यासाठी शिक्षण विभाग योग्य पावले उचलेल. शाळांमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित मुलांची ओळख पटवण्यासाठी योग्य ओळख आणि पडताळणी मोहीम राबवण्याची विनंतीही करण्यात आली आहे. बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना जारी केलेल्या जन्म प्रमाणपत्रांच्या नोंदणीची ओळख आणि पडताळणी करण्यासाठी मोहीमही चालवण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशी घुसखोरीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून या समस्येचे मुळापासून निवारण होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणे आवश्यक ! |