पंजाबमध्ये आतंकवाद आणि रक्तपात घडवण्याचा डाव!

पाकिस्तानसह ६ देशांतील ९ संघटना कार्यरत !

चंडीगड – पाकिस्तानसह ६ वेगवेगळ्या देशांमध्ये कार्यरत ९ संघटना पंजाबमध्ये आतंकवाद आणि रक्तपात घडवण्याची सिद्धता करत आहेत. यामध्ये पाकिस्तानशी संबंधित रणजित सिंह नीता यांची ‘खलिस्तान जिंदाबाद फोर्स’, वाधवा सिंह बब्बर यांची ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ आणि परमजीत सिंह पंजवार यांची ‘खलिस्तान कमांडो फोर्स’ या संघटनांचा समावेश आहे.

‘इकॉनॉमिक टाईम्सने पोलीस आणि गुप्तचर अधिकारी यांचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, खलिस्तान टायगर फोर्सचा हरदीप सिंह निज्जर हा लंडनमध्ये, खलिस्तान लिबरेशन फोर्सचे गुरजीत सिंह चीमा हा कॅनाडामध्ये, तर गुरमीत सिंह उपाख्य बग्गा आणि ‘खलिस्तान जिंदाबाद फोर्स’चे भूपिंदर सिंह भिंड हे जर्मनीत रहातात.
पंजाबमधील खलिस्तानवाद्यांच्या कारवायांमध्ये सर्वांत महत्त्वाची भूमिका ‘इंडो-कॅनेडियन नार्कोटिक्स सिंडिकेट’कडून बजावली जात आहे, जी ‘ब्रदर्स कीपर्स’ टोळी म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबमध्ये खलिस्तानी भावना भडकावण्याच्या प्रयत्नांना या गटांकडून छुप्या पद्धतीने साहाय्य केले जात आहे, असे पंजाबमधील आतंकवादविरोधी पथकाच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

संपादकीय भूमिका 

अशांचा बीमोड करण्यासाठी आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत !