जळगाव येथे राणी लक्ष्मीबाई यांना बलीदान दिनानिमित्त मानवंदना !

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदान दिनानिमित्ताने शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील स्मारकाजवळ हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

समष्टीच्या शुद्धीकरणासाठीच सनातन संस्थेचे कार्य चालू ! – विद्याधर नारगोलकर

हिंदूंनी भयावह परिस्थितीमध्ये काय करावे ? याचे मार्गदर्शन सनातन संस्था करते. हे एक प्रकारे समष्टीचे शुद्धीकरणाचेच कार्य चालू आहे. हे कार्य आपले आहे. ‘आता नाही तर परत कधीच नाही’, हे लक्षात घेऊन सर्वांनी दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

दगडफेक करणारे धर्मांध आणि सूत्रधार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !

जळगाव येथे २३ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात अशी मागणी करण्यात आली.

वर्धा येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदु राष्ट्रासाठी संघटित होण्याचा संकल्प !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त येथील आर्वी रोड येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

जळगाव येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करावे !

हिंदु जनजागृती समितीप्रणित ‘रणरागिणी’च्या माध्यमातून प्रतिवर्षी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदानदिनानिमित्त शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील स्मारकाची स्वच्छता करून तेथे पुष्पहार अर्पण करण्याचा उपक्रम राबवला जातो.

नंदुरबार येथे गुढीपाडव्यानिमित्त धर्मप्रसार आणि सामूहिक गुढीपूजन पार पडले !  

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रबोधनपर भित्तीपत्रके लावणे, फलकलेखन करणे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी यांना भेटून हिंदु नववर्षच्या शुभेच्छा देणे, तसेच सामूहिक गुढी उभारणे आदी माध्यमातून धर्मप्रसार आणि प्रबोधन करण्यात आले.

महिलांनी स्वत:तील शौर्य जागृत करून रणरागिणी बनणे आवश्यक आहे ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

इतिहासात महिलांना दुय्यम स्थान होते, असा खोटा प्रचार सध्या केला जातो; मात्र ते चुकीचे आहे. भारताला अनेक पराक्रमी आणि कर्तृत्ववान महिलांचा इतिहास लाभला आहे; परंतु दुर्दैवाने आपल्याला खरा इतिहास सांगितला जात नाही.

ब्राह्मणवाडा थडी (जिल्हा अमरावती) येथे शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा !

जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी या गावातील श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आणि हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक श्री. आकाश दाभाडे यांनी गावात जागृती होण्याच्या उद्देशाने ‘शिवव्याख्याना’चे आयोजन केले.

म्‍हसवड (जिल्‍हा सातारा) येथे ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा !’

या मोर्चात विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि धर्माभिमानी हिंदू सहस्रोंच्‍या संख्‍येने भगवे झेंडे, टोपी घालून सहभागी झाले होते. देवता आणि राष्‍ट्रपुरुष यांची वेशभूषा परिधान केलेली लहान मुले घोड्यावर, रथामध्‍ये विराजमान झाली होती.

हिंदु युवतींनी रणरागिणी होऊन ‘लव्‍ह जिहाद’चा सामना करण्‍यासाठी सिद्ध व्‍हावे ! – सौ. गौरी जोशी, रणरागिणी शाखा

ज्‍या देशात पुरुषांच्‍या बरोबरीने नव्‍हे, तर प्रसंगी युद्धात नेतृत्‍व घेऊन धर्मांध आक्रमकांना परतवून लावणार्‍या राजमाता जिजाऊ, राणी चेन्‍नम्‍मा यांसारख्‍या शूर, कर्तबगार स्‍त्रिया झाल्‍या, त्‍या देशातील हिंदु तरुणी धर्मांधांच्‍या खोट्या प्रेमाला फसून ‘लव्‍ह जिहाद’ला बळी पडत आहेत.