Germany Christmas Market Attack :जर्मनीत नाताळ बाजारात मुसलमान डॉक्टरने चारचाकी गाडीद्वारे लोकांना चिरडले ! : २ जण ठार, ६८ जण घायाळ

बर्लिन (जर्मनी)- जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरातील नाताळ बाजारात २० डिसेंबरच्या रात्री सौदी अरेबियाच्या तालेब नावाच्या मुसलमान डॉक्टरने लोकांवर चारचाकी चढवून चिरडले. यात २ जण ठार झाले, तर ६८ जण घायाळ झाले आहेत. ५० वर्षीय डॉ. तालेब सॅक्सनी-अनहॉल्ट राज्यात वर्ष २००६ पासून रहात आहे. त्याने एकट्यानेच हे आक्रमण केले. यामागील त्याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. आक्रमणापूर्वी त्याने बी.एम्.डब्ल्यू. चारचाकी गाडी भाड्याने घेतली होती.

यापूर्वी १९ डिसेंबर २०१६ या दिवशी बर्लिनमधील नाताळ बाजारावर एका इस्लामी आतंकवाद्याने गर्दीला ट्रकद्वारे चिरडले होते. यात १३ जण ठार झाले होते, तर १२ हून अधिक जण घायाळ झाले होते. या आक्रमणातील आतंकवाद्याला काही दिवसांनी इटलीमध्ये पोलिसांनी चकमकीत ठार केले होते.

आरोपी तालेब नास्तिकतावादी असल्याचा दावा

डॉ. तालेब याला वर्ष २०१६ मध्ये निर्वासित दर्जा मिळाला होता. तो मानसोपचारतज्ञांचा सल्लागार आहे. मॅग्डेबर्ग शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्नबर्गमध्ये तो औषधोपचार करत होता. तालेब पूर्वीचा मुसलमान आणि आताचा नास्तिकतावादी आहे. स्थलांतरितांच्या विरोधात भूमिका घेणार्‍या जर्मनीच्या ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’ या पक्षाचा तो समर्थक आहे. तालेब सौदी अरेबियामध्ये असतांना त्याला त्याचे नास्तिक विचार आणि दृष्टीकोन व्यक्त करता येत नव्हते; कारण तेथे इस्लाम हा एकमेव धर्म कायद्यानुसार मान्यताप्राप्त आहे. जर्मनीत आल्यावर त्याने सौदी अरेबिया आणि इतर आखाती देश येथील पूर्वीच्या मुसलमानांना या देशांतून पळून जाण्यासाठी आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी साहाय्य करण्यासाठी त्याने संकेतस्थळ बनवले होते.

दुसरीकडे सौदी अरेबियाने तालेबवर आतंकवाद आणि मध्य-पूर्व मुलींची युरोपियन देशांमध्ये तस्करी केल्याचा आरोप ठेवला आहे. जर्मनीने त्याला सौदी अरेबियाकडे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला आणि त्याला आश्रय दिला.

संपादकीय भूमिका

  • धर्मांध मुसलमानांच्या संदर्भात निधर्मीवाद आणि सर्वधर्मसमभाव असे डोस जगाला पाजणार्‍या युरोपीय देशांना चपराक !
  • अशा घटनांचा जगातील एकही इस्लामी देश, मुसलमान धर्मगुरु, त्यांच्या संघटना कधी निषेध करत नाहीत, हे लक्षात घ्या !