Bangladesh Attacks On Hindu Temples : बांगलादेशात २ दिवसांत ३ हिंदु मंदिरांतील ८ मूर्तींची तोडफोड : एका मुसलमानाला अटक

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात मैमनसिंग आणि दिनाजपूर येथील ३ हिंदु मंदिरांतील ८ मूर्तींची २ दिवसांत तोडफोड करण्यात आली. पोलीस अधिकारी अबुल खैर यांनी सांगितले की, १९ डिसेंबरच्या रात्री शकुआई भागातील एका मंदिरात २ मूर्ती तोडण्यात आल्या. याप्रकरणी अजहरूल या ३७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी कोणताही देश प्रत्यक्षात कोणतीही कृती करत नसल्याने तेथील हिंदूंचा निर्वंश होणार, हीच वस्तूस्थिती आहे !