नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असतांना सत्ताधार्यांनी खोट्या घोषणा करण्याऐवजी राज्याला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याची आवश्यकता आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवर केली आहे. सरकारकडून विविध योजनांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आकडे पुरवले जातात; मात्र उपाययोजना केली जात नाही. सर्वसामान्य जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प, रस्ते यांविषयी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. राज्य आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी झाले आहे; मात्र त्याच कोणतेही सुवेरसुतक सरकारला नाही, अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर टीका केली.