नवी देहली – संसदेचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरला गदारोळात संपले. या अधिवेशनात २० दिवस कामकाज न झाल्याने अंदाजे ८४ कोटी रुपयांची हानी झाली. संसदेच्या कामकाजावर प्रति मिनिट सुमारे २ लाख ५० सहस्र रुपये खर्च होतात.
लोकसभेत केवळ ६१ घंटे ५५ मिनिटे आणि राज्यसभेत ४३ घंटे ३९ मिनिटे कामकाज झाले. हा फार अल्प कालावधी आहे. याचा अर्थ असा की, लोकांसाठी महत्त्वाच्या सूत्रांवर संसदेत पुरेशी चर्चा होऊ शकली नाही.
संपादकीय भूमिकाजनतेचा हा पैसा गदारोळ घालणार्या प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून वसूल केला, तरच त्यांना जाणीव होईल ! तरीही ते गदारोळ घालत असतील, तर त्यांची खासदारकी रहित करण्याचा कठोर निर्णय घेणे आता आवश्यक झाले आहे ! असे केल्यानेच संसदेचे महत्त्व कायम राहील ! |