बारामती (जिल्हा पुणे) येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून बसवर दगडफेक

सरकारचा निषेध करण्यासाठी लोकशाहीत अन्य मार्ग सांगितले आहेत. बसवर दगडफेक करून नागरिकांना वेठीस धरण्याचा अधिकार वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना कोणी दिला ? त्यामुळे पोलिसांनी दगडफेक करणार्‍या कार्यकर्त्यांना लगेच अटक करून बसची झालेली हानीभरपाई त्यांच्याकडून वसूल करावी.

आरे कॉलनीतील वृक्षतोडीच्या विरोधातील सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या

मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. यामुळे राज्यशासन आणि मुंबई रेल्वे मेट्रो कॉर्पोरेशन यांचा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


Multi Language |Offline reading | PDF