नागपूर, २२ मार्च (वार्ता.) – येथे हिंदु नववर्षानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. गुढीपाडव्याविषयी माहिती देणार्या हस्तपत्रकाचे वितरण करण्यात आले. मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली. ९ ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून गुढीपाडव्याचे आणि अग्निहोत्राचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला.
सनातनच्या काही साधकांनी शेजारच्यांना घरी बोलवून गुढीपाडव्याचे महत्त्व सांगितले. काहींनी कामाच्या ठिकाणी (कार्यालयात) मधल्या वेळेत सहकार्यांना याविषयी माहिती सांगितली. पारडी परिसरातील शिवमंदिरात ‘स्वच्छता अभियान’, तर जमठा परिसरातील श्री राधा-कृष्ण मंदिरात ‘सामूहिक रामरक्षापठण’ घेण्यात आले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गुढीपाडवा विशेषांकाचे वितरण या वेळी करण्यात आले. अनेकांनी ‘व्हॉटसॲप’च्या माध्यमातून परिचितांना गुढीच्या पूजनाविषयी माहिती पाठवली. अशा विविध माध्यमांतून सहस्रो जिज्ञासूंपर्यंत विषय पोचवण्यात आला. अनेकांनी त्यानुसार कृती करण्याची सिद्धता दर्शवली.
१. वानाडोंगरी परिसरात सामूहिक गुढी उभारण्यात आली. त्या वेळी या वेळी एका धर्मसभेचे सभेचे नियोजन करण्यात आले. ‘असे उपक्रम आज काळाची आवश्यकता आहे. आम्ही तुम्हाला हवे ते साहाय्य आम्ही करू, तुम्ही असेच कार्यक्रम घेत जा’, असे अनेकांनी सांगितले. ‘आम्ही सत्संग आणि धर्मशिक्षणवर्गात जोडू’ असे या वेळी अनेकांनी सांगितले.
२. भारतीय योग संस्थान, पारडी यांच्या योगवर्गाच्या उद्घाटनाच्या सिद्धतेच्या वेळी संस्थानच्या वतीने सनातन संस्थेच्या प्रवचनासाठी जागा, तसेच त्यांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.