न्यूझीलंडमध्ये १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेल्यांना सिगारेट खरेदीवर बंदी

हा कायदा जरी करण्यात आला, तरी जे या दिनांकापूर्वी जन्मलेले आहेत, ते सिगारेट खरेदी करून या दिनांकानंतर जन्मलेल्यांना देऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत ! – अमिताभ बच्चन

एक हिंदु म्हणून अमिताभ बच्चन यांनी कधी हिंदूंच्या देवतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली होणार्‍या अवमानविषयी चकार शब्द तरी काढला आहे का ?

‘तुझ्या मित्राने मोर्च्यातील ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भातील छायाचित्र भ्रमणभाषवर ‘स्टेट्स’ला का ठेवले ?’ अशी विचारणा करत धर्मांधांकडून हिंदु मुलाला मारहाण !

धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि हिंदूंनी ते निमूटपणे सहन करायचे, अशी धर्मांधांची इच्छा  दिसते !

मध्यप्रदेशातील मुसलमान संघटनांचाही ‘पठाण’ चित्रपटाला विरोध !

खुर्रम मियाँ चिश्ती म्हणाले की, ‘पठाण’ या चित्रपटात मुसलमानांच्या भावना भडकावण्यात आल्या आहेत. शाहरुख खान असो किंवा दुसरा कुठलाही खान, आम्ही मुसलमान धर्माचा अपमान होऊ देणार नाही.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर आतंकवादमुक्त करण्यासाठी प्रथम पाकला संपवले पाहिजे, हे सरकारने जाणावे !

तवांगमध्ये चिनी सैन्य भारतीय सीमेत घुसखोरी करत होते ! – लेफ्टनंट जनरल कलिता

चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील यांगत्सेमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता; मात्र भारतीय सैन्याने चिनी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चिनी सैन्याला परत फिरणे भाग पडले.

विषारी दारू पिऊन मरणार्‍यांना एक रुपयाही हानीभरपाई देणार नाही ! – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्पष्टोक्ती

राज्यात गेली ६ वर्षे दारूबंदी असतांना राज्यात सर्रास दारू कशी मिळत आहे ?, याविषयी ते अपयशी का ठरले ? आणि ठरत आहेत ? तसेच यापुढे हे थांबवण्यासाठी ते काय करणार आहेत ?, हेही त्यांनी सांगायला हवे !

तुमच्या मागे साप दिसला, तर तो शेजार्‍यालाच नाही, तर तुम्हालाही दंश करील !

जग मूर्ख नाही. आज जग पाकिस्तानकडे आतंकवादाचे केंद्र म्हणून पहात आहे. पाकिस्तानला योग्य सल्ला आवडत नाही; पण तरीही माझा सल्ला आहे की, तुम्ही आतंकवाद सोडून चांगले शेजारी बनण्याचा प्रयत्न करा.

शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात भाजपकडून १७ डिसेंबरला ‘माफी मांगो’ आंदोलन !

हिंदूंच्या श्रद्धास्थानांची निंदानालस्ती उद्धव यांच्या शिवसेनेला सहन कसे होते ? हिंदु देवतांची टिंगलटिवाळी, ‘भगवान श्रीकृष्ण ‘डेट’ला गेले होते’, असे अत्यंत अशलाघ्य विधान करून अपमान करणे, हे शिवसेनेकडूनच होत आहे.

नाशिक येथे वारकर्‍यांचा सुषमा अंधारे यांच्या विरोधात मोर्चा

सुषमा अंधारे असतील, त्या पक्षाला मतदान करणार नाही ! – वारकर्‍यांची प्रतिज्ञा