|
(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)
कोईम्बतूर (तमिळनाडू) – येथे वर्ष १९९८ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांत ५८ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २३१ लोक घायाळ झाले होते. या स्फोटांमागील गुन्हेगार एस.ए. पाशा याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तमिळनाडूच्या द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) सरकारने पाशाच्या अंत्यसंस्कारासाठी अनुमती देण्यासमवेत सुरक्षेसाठी २ सहस्रांहून अधिक पोलिसांना तैनात केले. या अंत्यसंस्काराच्या वेळी सहस्रो धर्मांध मुसलमान, नेते आणि अभिनेते सहभागी झाले होते. एका आतंकवाद्याला अशा प्रकारचा ‘सन्मान’ दिल्यावरून भाजपने विरोध केला आणि आंदोलनही केले. पोलिसांनी आंदोलन करणार्यांना अटक केली.
भाजप, हिंदु मुन्नानी आणि विश्व हिंदु परिषद यांनी निषेधासाठी मोर्चा काढला होता. यात शेकडो लोक सहभागी झाले होते. त्यांना पोलिसांनी अटक केली. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी पोस्ट करत याची माहिती दिली.
संपादकीय भूमिकातमिळनाडूतील हिंदुद्वेषी द्रमुक सरकारकडून याहून वेगळे काय घडणार ? हिंदु धर्माला डेंग्यू आणि मलेरिया म्हणार्यांना जिहादी आतंकवाद मात्र जवळचा वाटतो, हे लक्षात घ्या ! |