‘तुझ्या मित्राने मोर्च्यातील ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भातील छायाचित्र भ्रमणभाषवर ‘स्टेट्स’ला का ठेवले ?’ अशी विचारणा करत धर्मांधांकडून हिंदु मुलाला मारहाण !

जिवे मारण्याचीही दिली धमकी !

नगर – येथे १४ डिसेंबरला झालेल्या मोर्च्यातील ‘लव्ह जिहाद’चे छायाचित्र तुझ्या मित्राने स्टेट्सला का ठेवले ?, अशी विचारणा करून चौघा धर्मांधांनी हिंदु विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी केली. ‘भ्रमणभाषवर समाजाविषयी काही छायाचित्रे, तसेच स्टेट्स ठेवल्यास एकेकाला जिवे मारू’, अशी धमकी दिल्याची घटना ‘भिंगार हायस्कूल’समोर १५ डिसेंबरला घडली.


याविषयी नगर तालुक्यातील शहापूर येथील एका १७ वर्षीय युवकाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीत युवकाने नमूद केले आहे की, मी ११ वीचा विद्यार्थी आहे. १५ डिसेंबरला भिंगार हायस्कूल येथे बक्षीस समारंभ असल्याने मी शाळेत गेल्यावर अंगावर शाळेचा गणवेश नसल्याने मला आमच्या वर्गशिक्षिकेने पाठीमागे बसवले होते. त्या वेळी माझ्याजवळ आमच्या गावातील इयत्ता १२ वीच्या वर्गातील तिघे जण एकत्र बसले होते. मला वर्गशिक्षिकेने उठवून मुलांच्या पुढे बसवले. त्या वेळी तिघांनी मला पाठीमागून खडे मारले. खडे मारल्याविषयी मी त्यांच्याकडे विचारणा केली असता एक जण मला शिवीगाळ करून ‘तू बाहेर ये’, असे म्हणाला. मी नंतर भिंगार हायस्कूल येथून बाहेरील रस्त्यावर आलो असता तेथे ते ३-४ जण आले आणि त्यापूर्वीच तेथे १० ते १५ धर्मांध मुले उभी होती.

त्यांतील एकाने माझी कॉलर पकडून मला खाली पाडून मारहाण केली. त्या वेळी इतर १० ते १५ धर्मांध मुलांनी मला लाथा-बुक्यांनी मारहाण करून ‘तुझ्या मित्राने १४ डिसेंबरला झालेल्या मोर्च्यातील ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भातील छायाचित्र स्टेट्सला का ठेवले ?’, असे विचारले आणि ‘पुन्हा जर समाजाच्या विरोधात काही छायाचित्रे किंवा स्टेट्स ठेवले, तर तुम्हा एका एकाला जिवे मारून टाकू’’, अशी धमकी दिली. या सर्व धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

यावरून ‘धर्मांधांना हिंदूंनी लव्ह जिहादविषयी जागृती केलेलीही नको आहे’, हे स्पष्ट होते. धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि हिंदूंनी ते निमूटपणे सहन करायचे, अशी धर्मांधांची इच्छा  दिसते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात हिंदूंवर ही वेळ येणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !