मंदिरात करण्यात आली लुटमार !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील नाटोर जिल्ह्यातील कासिमपुरा येथे मंदिरातील सेवक तरुण दास (वय ५५ वर्षे) यांची अज्ञाताकडून हत्या करण्यात आली. या मंदिराची लूट केल्यानंतर दास यांची हत्या करण्यात आल्याचे दिसून आले. दास यांचे हातपाय प्लास्टिकच्या दोरीने बांधलेले होते, तर त्यांच्या डोक्यावर जखम होती. रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. ‘सनातन जागरण जोत’ या हिंदु संघटनेकडून याविरोधात निदर्शने करण्यात आली.
🚨 Shocking Incident in Natore, Bangladesh:
Fanatics loot a temple and brutally kill its 55-year-old Hindu worker. 😔🕉️
Despite India’s appeals to protect Hindus and their religious places, this tragedy highlights the lack of action by the Bangladeshi Government.
Hindus… pic.twitter.com/6DlLTBrJKp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 22, 2024
१. कोलकाता येथील इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत या घटनेचा निषेध केला आहे. राधारमण दास यांनी म्हटले की, बांगलादेश पोलिसांनी या घटनेचे वर्णन दरोड्याचे प्रकरण असे केले आहे. लूटमार आणि हिंसाचार अशा घटनांमध्ये केवळ हिंदूंनाच लक्ष्य केले जाते हे कसे होऊ शकते ?
२. इस्कॉनच्या आणखी एका अनुयायाने सांगितले की, परिस्थिती सतत बिघडत असल्याने केवळ चर्चा करून चालणार नाही. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार ८ डिसेंबर २०२४ पर्यंत हिंदू आणि इतर अल्पसंख्य यांच्याविरुद्ध हिंसाचाराच्या २ सहस्र २०० घटना घडल्या आहेत. हा आकडा चुकीचा आहे; कारण अनेक घटनांची नोंद होत नाही.
३. ‘व्हॉईस ऑफ बांग्लादेशी हिंदू’ या ‘एक्स’वरील खात्यावर एका मंदिराचे छायाचित्र प्रसारित केले आहे, ज्यामध्ये हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींना हानी पोचवण्यात आल्याचे दिसत आहे. यात म्हटले आहे की, जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांनी बीरगंज उपजिल्ह्यातील झारबारी गावात एका हिंदु मंदिरावर आक्रमण करून मूर्तीची तोडफोड करण्यात आली.
संपादकीय भूमिकाभारत सरकारने बांगलादेशाच्या सरकारला हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करण्याचे आवाहन केले; मात्र बांगलादेशाकडून असा कोणताही प्रयत्न केला जात नाही, हेच ही घटना दर्शवत आहे. भारत आता तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे काय करणार आहे, हे त्याने सांगायला हवे किंवा करून तरी दाखवायला हवे, असेच हिंदूंना वाटते ! |