न्यूझीलंडमध्ये १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेल्यांना सिगारेट खरेदीवर बंदी

वेलिंग्टन (न्यूझीलंड) – न्यूझीलंड सरकारने मुला-मुलींना सिगारेट खरेदी करण्यास आयुष्यभरासाठी बंदी घातली आहे. वर्ष २०२५ पर्यंत देशातील ५ टक्के लोकांना तंबाखूमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या ८ टक्के युवा सिगारेट आणि तंबाखू यांचे सेवन करतात.
न्यूझीलंडमधील नव्या कायद्यानुसार, १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेल्यांना सिगारेट खरेदी करण्यास मनाई करण्यात आली आहे. म्हणजेच या दिनांकापूर्वी जन्मलेल्यांनाच केवळ सिगारेट खरेदी करता येणार आहे.

पुढे अशांना ते या दिनांकापूर्वी जन्मलेले आहेत, याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. हा कायदा जरी करण्यात आला, तरी जे या दिनांकापूर्वी जन्मलेले आहेत, ते सिगारेट खरेदी करून या दिनांकानंतर जन्मलेल्यांना देऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.