काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावरील संग्रहालयाला काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा विरोध

काँग्रेसच्या लेखी धर्मांधांनी आक्रमण करायचे आणि हिंदूंनी मार खात रहायचा, हाच धार्मिक सद्भाव आहे. त्यामुळे हिंदूंना आता वस्तूस्थिती सांगितली जाऊ लागल्यानेच काँग्रेसींना मिरच्या झोंबू लागल्या आहेत आणि ते अशा संग्रहालयाला विरोध करत आहेत !

युक्रेनने रशियन सैन्यावर केली ‘शक्तीशाली आक्रमणे’ ! – युक्रेन

युक्रेनच्या सैन्याने २५ मार्च या दिवशी मोठी कामगिरी केल्याचा दावाही केला गेला आहे. युक्रेनी सैन्याने राजधानी कीवजवळील ३ शहरे रशियाच्या कह्यातून मुक्त केली आहेत.

त्रिपुरा राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मागणी करणार्‍या भाजपच्या आमदाराला धर्मांधाकडून ठार मारण्याची धमकी

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीवरून नेहमीच आकांडतांडव करणारे या घटनेविषयी का बोलत नाहीत ?

पाकिस्तानमध्ये चर्चच्या क्रॉसची धर्मांधांकडून तोडफोड

महंमद बिलाल या तरुणाने येथील चर्चच्या क्रॉसवर चढून ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा दिल्या. त्याच्यासमवेत आणखी २ जण होते. या वेळी त्यांनी ख्रिस्ती तरुणींकडे पाहून अश्लील हातवारेही केले.

३१ मार्चपर्यंत संप मागे घेतल्यास कारवाई करण्यात येणार नाही !

कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा, यासाठी मी ७ वेळा आवाहन केले आहे. एस्.टी.च्या संपामुळे ४८ कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली आहे. १९ अपघात झाले आहेत. ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्या कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांसह आदित्य, तेजस आणि रश्मी ठाकरे यांच्यावर किरीट सोमय्या यांचा आर्थिक घोटाळ्याचा आरोप !

उद्धव ठाकरे परिवाराने ‘कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड’ हे आस्थापन नंदकिशोर चतुर्वेदी आणि ‘ल्यूक बेनेडिक्ट’ यांना विकले. यामध्ये ७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे विधान म्हणजे काश्मीरमध्ये अनन्वित अत्याचार सहन केलेल्या हिंदूंचा अवमान ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

मुख्यमंत्री केजरीवाल काश्मीरमधील हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित या चित्रपटावर हास्यविनोद करतांना ही दिसत आहेत. हा त्यांचा निर्दयीपणाच आहे !

‘वैयक्तिक जीवनासाठी’ आणि ‘राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी’ वेळ देणे

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कोणीही तयार नसतो !’

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या कार्यालयात घुसून दोघांकडून व्यवस्थापकांना धक्काबुक्की !

जो हिंदूंवरील अत्याचारांचे सत्य सांगतो, त्यालाच विरोधाला सामोरे जावे लागते. ‘सत्याचे तोंड दाबण्याचा अश्लाघ्य प्रकार’, असेच याला म्हणावे लागेल !

चीनने प्रथम सीमेवरून सैन्य हटवावे, तरच द्विपक्षीय संबंध सामान्य होतील !

वर्ष २०२० च्या गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांतील सर्वोच्च स्तरावरील ही पहिलीच चर्चा आहे. प्रत्येक वेळी भारताने पूर्व लडाखमध्ये चीनने सैन्य पूर्णपणे मागे घेण्याचे आवाहन केले आहे.