गोव्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास १ एप्रिलपासून नवीन मोटर वाहन कायद्यानुसार ११ पटींनी अधिक दंड

सुधारित नवीन मोटर वाहन कायद्याची गोव्यात १ एप्रिलपासून कार्यवाही करण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे. नवीन कायद्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यास पूर्वीच्या तुलनेत ६ ते ११ पटींनी अधिक दंड ठोठावला जाणार आहे.

(म्हणे) ‘मुसलमानांच्या विरोधात द्वेष पसरवणार्‍या चित्रपटाला आळा घालण्यासाठी न्याययंत्रणेने हस्तक्षेप करावा !’ – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या आतंकवादाचे आरोप असलेल्या संघटनेला पोटशूळ !

कर्नाटकमध्ये आता खासगी शाळामध्येही हिजाबबंदी !

कर्नाटक सरकारने आता राज्यातील खासगी शाळामध्येही परीक्षेच्या कालावधीत हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालून येण्यावर बंदी घातली आहे.

पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात ६ दिवसांत पाचव्यांदा वाढ !

देशात इंधनाचा भडका चालूच आहे. मागील ६ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात पाचव्यांदा वाढ झाली आहे. २७ मार्च या दिवशी पेट्रोल ५० पैशांनी, तर डिझेल ५५ पैशांनी महाग झाले. एकूण ६ दिवसांत ३ रुपये ७५ पैशांपर्यंत इंधन दरवाढ झाली आहे.

तालिबानकडून महिलांनी एकट्याने विमान प्रवास करण्यावर प्रतिबंध !

भारतात शाळांमध्ये हिजाबवर बंदी घातल्यावर ‘मुसलमान स्त्रियांच्या हक्कांवर घाला घातला’, अशी बिनबुडाची टीका करणारे भारतातील पुरो(अधो)गामी यांना ‘महिलांच्या हक्कांवर गदा आणणे; म्हणजे नक्की काय असते ?’, हे समजून घेण्यासाठी अफगाणिस्तानला पाठवा !

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी दौसा (राजस्थान) येथे काँग्रेसच्या आमदाराच्या मुलाला अटक

आरोपी राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा मुलगा असल्याने त्याला शिक्षा होण्याची शक्यता अल्पच आहे, असे जनतेला वाटत असणार, यात शंका नाही !

बंगालमध्ये आतापर्यंत सापडले ३५० हून अधिक गावठी बाँब

बंगालमधील ही स्थिती राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची अपरिहार्यता स्पष्ट करणारी आहे !

भूमीवरून आकाशात मारा करणार्‍या भारताच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी !

भारताने येथील समुद्रकिनारी भूमीवरून आकाशात मारा करणार्‍या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. काही दिवसांपूर्वी अंदमान आणि निकोबर येथे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती.

बडगाम येथे आतंकवाद्यांकडून विशेष पोलीस अधिकार्‍याची हत्या

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

मदरशांत राष्ट्रविरोधी शिकवण दिली जात असल्याने त्यांवर बंदी घाला !

कर्नाटकातील भाजपच्या आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी