चीनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेमुळे घातलेल्या निर्बधांच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन
नागरिकांना अन्नधान्य पुरवठ्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. व्यवसाय बंद असतांना अनेकांसमोर ‘घराचे भाडे कसे देणार ?’ असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे नागरिकांनी दळणवळण बंदी मागे घेण्याची आग्रही मागणी केली आहे.