शिवमोग्गा (कर्नाटक) येथे जमावबंदी असतांनाही धर्मांधांकडून हिंदूला मारहाण

धर्मांध आणि व्यंकटेश यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद  झाला. त्यानंतर धर्मांधांनी व्यंकटेश यांच्यावर आक्रमण केले.

‘इराणसमवेतच्या संबंधांवर परिणाम होणार नाही’, असे लिहून द्या ! – रशियाची अमेरिकेकडे मागणी

अमेरिकेच्या निर्बंधांचा इराणसमवेतच्या संबंधांवर परिणाम होणार नाही, अशी रशियाने अमेरिकेकडून लेखी आश्वासनाची मागणी केली आहे, असे वृत्त ‘तास’ या रशियाच्या वृत्तसंस्थेने रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्या हवाल्याने दिले आहे.

केरळमधील मदरशात शिकणार्‍या मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांध शिक्षकाला अटक

केरळमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या मदरशातील शराफुद्दीन या २७ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली.

रशिया ३ अटींवर युक्रेनशी चर्चा करण्यास सिद्ध !

पुतिन यांनी ‘युक्रेन हा तटस्थ आणि गैर-अणूऊर्जा देश असेल’, ‘क्रिमिया हा रशियाचाच भाग आहे, हे युक्रेनने मान्य करावे’ आणि ‘पूर्व युक्रेनच्या बंडखोर भागांचे स्वातंत्र्य मान्य केले जावे’, अशा ३ अटी ठेवल्या आहेत.

नवीन याचा मृतदेह आणण्याचे प्रयत्न चालू आहेत ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई

युक्रेनमध्ये गोळीबारात मरण पावलेला एम्.बी.बी.एस्.चा विद्यार्थी नवीन शेखरप्पा याचा मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.

मी कीव येथे असून कुठेही लपलेलो नाही ! – व्लोदिमिर झेलेंस्की, राष्ट्राध्यक्ष, युक्रेन

रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात पोलंडला पळून गेल्याच्या अफवेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत.

पाकिस्तानने अफगाणिस्तानला सडलेला गहू पाठवल्याने तालिबान संतप्त !

भारताचा गहू पाहून नागरिकांनी केले कौतुक
इस्लामी देशांचीही फसवणूक करणार्‍या पाकची वृत्ती यातून दिसून येते !

युक्रेनचा आकाशमार्ग ‘निषिद्ध क्षेत्र’ (नो फ्लाय झोन) घोषित करण्यास ‘नाटो’चा नकार !

यापुढे होणार्‍या मृत्यूंना ‘नाटो’ उत्तरदारयी असल्याची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची टीका

युद्धासाठी रशियाला उत्तरदायी धरले पाहिजे ! – ‘जी सेव्हन’ राष्ट्रे

वर्ष २०१४ मध्ये रशियाने युक्रेनमधील क्रिमिया प्रांतावर आक्रमण करून तो कह्यात घेतल्यानंतर या राष्ट्रांच्या गटातून रशियाला काढून टाकण्यात आले होते. त्यानंतरही रशियाने क्रिमियावरील दावा सोडला नाही.