भाग्यनगर (तेलंगाणा) येथील मंदिराच्या अध्यक्षावर कत्तलीसाठी गाय विकल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद !

मंदिराचे अध्यक्षच असे करत असतील, तर हिंदूंनी विश्‍वास तरी कुणावर ठेवायचा ? अशांना फाशीचीच शिक्षा होण्याची मागणी गोप्रेमी हिंदूंनी केली पाहिजे !

बीरभूमच्या प्रकरणावरून बंगाल विधानसभेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या आमदारांमध्ये हाणामारी

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतांनाच आता विधानसभेतही तिच स्थिती असणे, हे राज्यात आता बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचीच वेळ आली असल्याचे द्योतक आहे !

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे भाजपचा विजय साजरा करणार्‍या मुसलमान तरुणाची त्याच्या धर्मबांधवांकडून हत्या !

याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी पक्ष  आदी राजकीय पक्ष काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

राज्य सरकार कोणत्याही धार्मिक समुदायाला अल्पसंख्यांक घोषित करू शकते !  

कोणतेही राज्य सरकार स्वतःच्या राज्यातील हिंदूंसह कोणत्याही धार्मिक किंवा भाषिक समुदायाला ‘अल्पसंख्यांक’ घोषित करू शकते, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले.

यंदाच्या वर्षापासून पुन्हा चालू होणार अमरनाथ यात्रा !

गेल्या २ वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे स्थगित ठेवण्यात आलेली अमरनाथ यात्रा यंदाच्या वर्षापासून पुन्हा चालू होणार आहे. या यात्रेतील भाविकांना कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे पालन करावे लागणार आहे.

‘काश्मिरी हिंदूंवर अन्याय झाला असून सर्वांनी मिळून त्यांना साहाय्य केले पाहिजे !’

जर हे केजरीवाल यांना ठाऊक होते, तर त्यांनी आधीच हे का सांगितले नाही आणि त्यांना ते काय साहाय्य करू शकत आहेत, हे का घोषित केले नाही ? असे प्रश्‍न उपस्थित होतात !

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय ! – सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरसई (गोवा) येथे २७ मार्च या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ संपन्न झाली. या सभेचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .

सनातन संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विविध पक्षांचे आमदार यांचे अभिनंदन

सनातन संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विविध पक्षांचे आमदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

हिंदी मालिकेतील अभिनेत्री अनघा भोसले यांचा मनोरंजन सृष्टी सोडण्याचा निर्णय !

आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा निर्णय ! मानव जन्म हा देवाची सेवा आणि प्रेम करण्यासाठी, तसेच कृष्णाचा आत्मा पसरवण्यासाठी आहे. जे तुम्हाला भगवान श्रीकृष्णापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवणे योग्य आहे.

१ एप्रिलपासून भविष्य निर्वाहनिधी, पोस्ट ऑफिसच्या योजना, जी.एस्.टी. आदींच्या नियमांत होणार महत्त्वपूर्ण पालट !

१ एप्रिलपासून भविष्य निर्वाहनिधीच्या खात्यावर कर आकारला जाईल. अडीच लाख रुपयांपर्यंत कर नसेल, तर सरकारी कर्मचार्‍यांसाठी ही मर्यादा ५ लाखांची असेल.