भाजप, बजरंग दल आणि विहिंप यांच्या विरोधानंतर शिवमोग्गा जत्रोत्सवात मुसलमान दुकानदारांना अनुमती नाकारली

शिवमोग्गा येथे नुकत्याच झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्या हर्षा याच्या हत्येमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

(म्हणे) ‘काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचारांना मी उत्तरदायी असेन, तर मला फाशी द्या !’ – फारुख अब्दुल्ला

असे सांगून फारुख अब्दुल्ला स्वतःविषयी सहानुभूती मिळवू पहात आहेत. हिंदूंवरील अत्याचारांना कोण उत्तरदायी आहे, हे आता जनतेला समजले आहे.

झेलेंस्की यांच्याकडून पोप फ्रान्सिस यांना युद्धासंदर्भात मध्यस्थी करण्याचे आवाहन !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी जगभरातील ख्रिस्त्यांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्याशी रशिया-युक्रेन युद्धाविषयी चर्चा केली. ‘रशियासमवेत चालू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळावा’, यासाठी पोप यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहनही झेलेंस्की यांनी या वेळी केले.

ऑस्ट्रेलियाने भारताला परत दिल्या भगवान विष्णु, शिव आणि जैन पंथ यांच्या चोरीला गेलेल्या प्राचीन मूर्ती !

देवतांच्या प्राचीन मूर्ती चोरीला जाऊ नयेत, यासाठी सरकार आतातरी ठोस पावले उचलणार का ?

बीरभूम (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर १० जणांना जिवंत जाळले !

या घटनेवरून आता केंद्र सरकारने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

मध्यप्रदेशामध्ये धर्मांध आरोपींच्या अवैध बांधकामांवर प्रशासनाकडून कारवाई

धर्मांधांकडून अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपलेले असते का ?

पाकच्या कारागृहात अडकले आहेत भारताचे ५७७ मच्छिमार !

गेल्या ५ वर्षांत ९ भारतियांचा पाकच्या कारागृहात मृत्यू

(म्हणे) ‘रशियाच्या संदर्भात भारताची भूमिका अस्थिर !’ – अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन

एखाद्याला आधी लढण्यासाठी प्रोत्साहित करायचे आणि नंतर प्रत्यक्ष युद्ध चालू झाल्यावर त्याला साहाय्य न करता मरण्यासाठी सोडून देऊन त्याचा विश्‍वासघात करायचा, अशी कृती भारताने कधी केली नाही, हे बायडेन यांना भारताने सुनावले पाहिजे !

कोटा, राजस्थान येथे एक मासासाठी जमावबंदी लागू

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रक्षेपणाच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोटा, राजस्थान येथे २२ मार्च ते २१ एप्रिल २०२२ यो एका मासासाठी जमावबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

लंडन येथे हिंदु विद्यार्थिनीची मुसलमान प्रियकराकडून हत्या

भारतीय वंशांची १९ वर्षीय तरुणी सबिता थानवानी हिची हत्या केल्याच्या प्रकरणी महीर मारूफ या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा ट्युनिशिया येथील रहिवासी आहे.