साधकांना आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणार्या आणि साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीचा ध्यास असणार्या सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्याविषयी सोलापूर येथील साधकांना जाणवलेली सूत्रे
‘आम्हाला साधनेची दिशा आणि सेवेची प्रेरणा मिळावी अन् आमच्याकडून भावजागृतीचे प्रयत्न व्हावेत’, यासाठी सद्गुरु स्वातीताई इतक्या आर्ततेने प्रयत्न करतात की, त्यामुळे पुष्कळ साधकांचा भाव जागृत होऊन त्यांना अनुभूती येतात.