रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘हिंदु राष्ट्र कसे असेल ?’, याचे प्रत्यक्ष दर्शन रामनाथी आश्रमात होते.’ – श्री. मानव बुद्धदेव, सचिव आणि मिडिया प्रभारी, योग वेदांत सेवा समिती

प.पू. दास महाराज यांनी ‘विदेही स्थिती’विषयी केलेले विवेचन

मी कर्मकांड करून यज्ञ-याग करत होतो, त्या वेळी मी सगुणात होतो. त्यानंतर गुरुदेवांनी मला नामजपादी उपाय करायला सांगून मला निर्गुणाची वाटचाल करायला शिकवली.

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्याशी ३५ मिनिटे साधला संवाद !

या वेळी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने केलेल्या साहाय्यासाठी झेलेंस्की यांचे आभार मानले.

युद्धामुळे जागतिक अन्न टंचाई आणि धान्याची भाववाढ होणार !

‘यारा इंटरनॅशनल’ या खतनिर्मिती करणार्‍या जागतिक आस्थापनाला भीती
युरोप आणि आफ्रिकेत धान्य टंचाईचे संकट

प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा आदेश !

मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने दिले आहेत.

विद्यार्थ्यांना ‘हिंदुइज्म : धर्म या कलंक ?’ हे पुस्तक वाटणार्‍या निर्मला कामड या शिक्षिकेला अटक !

कामड यांच्यावर कलम २९५ (एखाद्या धर्माचा अवमान करणे) आणि भा.दं.वि. ५०५ (धर्म किंवा समाज यांच्या विरोधात द्वेष पसरवणारा मजकूर प्रसारित करणे) अंतर्गत कारवाई करण्यात आली.

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयाने दिले आहेत.

फिरोजपूर (पंजाब) येथील सीमेवर भारतीय सैनिकांनी पाकचे ड्रोन पाडले !

भारताच्या वारंवार कुरपती काढणार्‍या पाकला सरकार त्याला समजेल अशा भाषेत धडा कधी शिकवणार ?

रशियाकडून युक्रेनच्या ४ शहरांमध्ये युद्धविरामची घोषणा

रशियाने युद्धाच्या १२ व्या दिवशी युक्रेनच्या ४ शहरांमध्ये युद्धविरामची घोषणा केली. हा युद्धविराम दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.५० वाजेपर्यंत असणार आहे.

युक्रेनवर युद्ध लादण्यात आले आहे ! – पोप

युक्रेनवर युद्ध लादण्यात आले आहे. तेथे रक्त आणि अश्रू यांच्या नद्या वहात आहेत. हे युद्धच असून त्यात मृत्यू आणि विध्वंस होत आहे, असे प्रतिपादन ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी येथे केले.