तब्बल ३१ वर्षांनी आतंकवादी बिट्टा कराटे याच्या विरोधात श्रीनगर न्यायालयात याचिका प्रविष्ट !

जे कार्य आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी करायला हवे, ते एका चित्रपटाने करून दाखवले. ही परिस्थिती देशासाठी लज्जास्पद !

जर पंतप्रधान मोदी मध्यस्थ होण्यास इच्छुक असतील, तर आम्ही स्वागत करू ! – युक्रेन

तुमचे रशिया आणि पुतिन यांच्यासमवेत असलेल्या चांगल्या संबंधांचा लाभ घेत हे युद्ध थांबवा, असे आवाहन युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केले आहे.

गुढी उभारण्याची पद्धत आणि त्याचा पूजाविधी : पहा VIDEO

हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस (२ एप्रिल २०२२) म्हणजे चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा अर्थात् गुढीपाडवा. गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे, हे मंत्रांसह वाचकांसाठी येथे देत आहोत. प्रत्यक्ष गुढी ज्या ठिकाणी उभारावयाची आहे, त्या ठिकाणी गुढी उभारून हे पूजन करावे.

गरोदर बकरीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक !

एका मुक्या प्राण्यावर अशाप्रकारे अत्याचार करणे, यातून मानवाची किती पराकोटीची अधोगती झाली आहे, हे लक्षात येते ! अशा प्रातिनिधिक घटनांतून समाजपुरुषाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, याचे महत्त्वही पुन्हा एकदा अधोरेखित होते !

#Gudhipadva : कडुनिंब घालून नैवेद्य कसा बनवावा ? – पहा VIDEO !

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि अन्य पदार्थ एकत्रित करून मिश्रण सिद्ध (तयार) केले जाते. या दिवशी मिश्रणासाठी कडुनिंबाचाच वापर करण्यामागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

चीनच्या सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा संसर्ग : ५ शहरांत दळणवळण बंदी

चीनच्या सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी चीनने कार्यान्वित केलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ही कुचकामी ठरतांना दिसत आहे.

इम्रान खान यांच्या हत्येचा कट ! – पाकच्या माजी मंत्र्याचा दावा

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आले आहे. ते त्यागपत्र देण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘त्यांच्या जिवाला धोका असून त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे’, असा दावा पाकचे माजी जलसंपदामंत्री तथा सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते फैसल वावडा यांनीच केला आहे. 

दोघा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या धर्मांध पोलीस अधिकार्‍याला ९ वर्षांनंतर जन्मठेप

मेघालयाच्या एका विशेष न्यायालयाने २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नुरुल इस्लाम याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच ८ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

फ्रान्सच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखाची हकालपट्टी !

रशिया-युक्रेन युद्धाचा अचूक अंदाज न बांधल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. अन्य एका वृत्तानुसार विविध विषयांवर त्यांचे अपूर्ण ज्ञान असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

नवाज शरीफ यांनीच भारताला कसाबचा पत्ता दिला ! – पाकच्या गृहमंत्र्याचा दावा

मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या आक्रमणातील  जिवंत पकडण्यात आलेला एकमेव आतंकवादी अजमल कसाब याचा पाकमधील पत्ता पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीच भारताला दिला होता.