गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपकडून पुन्हा डॉ. प्रमोद सावंत यांची निवड : राज्यपालांकडे केला सरकार स्थापनेचा दावा

‘भावी मुख्यमंत्री कोण ?’ याविषयी राज्यातील गेले काही दिवस चाललेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. यानंतर भाजप सायंकाळी उशिरापर्यंत राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांची भेट घेऊन गोव्यात सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.

नोएडा येथे शिवमंदिरात घुसून शिवलिंगाची तोडफोड

भाजपशासित उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या मंदिरावर आक्रमण होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

भारताने नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण राखले !

स्वार्थ साधण्यासाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताचे कौतुक ! इम्रान खान मनापासून भारताचे कौतुक करत आहेत’, असे कुणी समजू नये. पाक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला भारताशी व्यापार करायचा आहे. त्यामुळे खान भारताला चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांच्या सेवेतील १ सहस्र कर्मचारी पालटले !

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी स्वतःची हत्या होण्याच्या भीतीने त्यांच्या सेवेत असलेले १ सहस्र कर्मचारी पालटले. त्यांच्या जागी नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

सुपौल (बिहार) येथे धर्मांध सरपंच आणि त्याच्या साथीदारांकडून एका घरात घुसून मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न !

बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने वाटचाल करत आहे, असेच यातून दिसून येते !

भाजप पाकव्याप्त काश्मीरही स्वतंत्र करील ! – केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

ही राष्ट्रप्रेमींची फार पूर्वीपासूनची इच्छा असल्यामुळे ती लवकरात लवकर पूर्ण करावी, असेच राष्ट्रप्रेमींनी वाटते !

‘लज्जा’ पुस्तकावरून चित्रपट काढण्याचे धाडस अद्याप कुणीही केलेले नाही ! – लेखिका तस्लिमा नसरीन यांची खंत

या पुस्तकामध्ये बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदूंवर करण्यात येत असलेल्या अत्याचारांची माहिती देण्यात आली आहे.

कोलार (कर्नाटक) येथील ‘क्लॉक टॉवर’वर गेल्या ७५ वर्षांपासून फडकत असलेला इस्लामी ध्वज काढून राष्ट्रध्वज फडकवला !

या ‘टॉवर’वर फडकणार्‍या इस्लामी ध्वजाला इतक्या वर्षांत निधर्मीवाद्यांनी कधीही विरोध केला नाही, हे लक्षात घ्या !

बोधन (तेलंगाणा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यास एम्.आय.एम्. आणि तेलंगाणा राष्ट्र समिती यांचा हिंसक विरोध

तेलंगाणात छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारी तेलंगाणा राष्ट्र समिती सत्तेत असल्यास तेथे छोटी पाकिस्ताने निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! असे पक्ष भारतात असणे, हे लज्जास्पद !