रशियाने ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ यांना ‘आतंकवादी संघटना’ ठरवून घातली बंदी !

ट्विटर आणि फेसबूक यांद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, तसेच भारतविरोधी विचारांचा प्रसार करणे आदी गोष्टी केल्या जातात. अशा सामाजिक माध्यमांवर भारतात कधी बंदी घातली जाणार ?

(म्हणे) ‘मुसलमानांना व्यापार करण्याची अनुमती द्यावी !’ – मुसलमान व्यापारी संघटनेची मागणी

हिजाबविषयीच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात व्यापार्‍यांनीही आंदोलन केल्याने त्यांना हिंदूंच्या जत्रांत व्यापार करण्यास बंदी !

गेल्या ३ वर्षांत देशात दलितांवरील अत्याचारांची १ लाख ३८ सहस्रांहून अधिक प्रकरणांची नोंद ! – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माहिती

गेल्या ३ वर्षांत हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचीही आकडेवारी केंद्र सरकारने देशातील जनतेला सांगितली पाहिजे !

बरेलीमध्ये भाजपला मतदान केल्यासाठी मुसलमान महिलेला घरातून हाकलले : तलाक देण्याची धमकी

याविषयी स्वतःला निधर्मी म्हणवणारे काहीही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

जेव्हा रशियाला स्वतःच्या अस्तित्वाचा धोका जाणवेल, तेव्हा अण्वस्त्रांचा वापर होईल ! – रशिया

‘पुतिन आण्विक शस्त्रांचा वापर करणार नाही, यावर पूर्ण विश्‍वास आहे का ?’ असा प्रश्‍न रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले.

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आणणार ! – पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री धामी यांचा स्तुत्य निर्णय ! भाजपशासित प्रत्येक राज्याने हा निर्णय घ्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे.

जम्मू-काश्मीरच्या राजघराण्याचे वंशज विक्रमादित्य सिंह यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी !

काँग्रेसच्या अधःपतनाला आरंभ झाला असून असे अशा अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भविष्यात पक्ष सोडल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी ८ जणांना अटक : सत्ताधारी द्रमुकचे दोघा कार्यकर्त्यांचा समावेश

बलात्कार्‍यांचा भरणा असलेला पक्ष लोकांना कधी कायद्याचे राज्य देईल का ?

अमेरिकेच्या वायूदलात कार्यरत भारतीय वंशाच्या हिंदु तरुणाला कपाळावर टिळा लावण्याची अनुमती

जर अमेरिका अशी सवलत देते, तर भारतातही ती मिळाली पाहिजे, तशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !

आता ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट येणार !

‘द कश्मीर फाइल्स’ने आता दडपलेला सत्य इतिहास देशासमोर आणण्याला प्रारंभ केला आहे. आता हळूहळू सर्वच इतिहास समोर आणून पीडित हिंदूंना न्याय देण्याचा प्रयत्न होणे हा काळानुसार होत असलेला पालटच होय !