महाविद्यालयाने हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेस बसण्याची अनुमती नाकारली !

न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यास नकार देणार्‍या धर्मांध विद्यार्थिनींनी भविष्यात कायदाद्रोही वर्तन करून समाजाची शांतता बिघडवल्यास आश्‍चर्य ते काय ?

हवामान पालटामुळे भारताच्या शेतीवर मोठा परिणाम होणार !

हवामान पालटामुळे अतीवृष्टी किंवा दुष्काळ, महापूर आणि उष्माघाता यांसारख्या घटना घडू शकतात. यासह भारताच्या शेतीवर मोठा परिणाम होण्याची, तसेच उत्पादन अल्प होण्याची शक्यता आहे.

युक्रेनमधील रुग्णालयांत प्राणवायुचा (ऑक्सीजनचा) मोठा तुटवडा

या तुटवड्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली असून ‘जर युक्रेनमधील रुग्णालयांत त्वरित प्राणवायु उपलब्ध करून दिला नाही, तर मोठा अनर्थ घडू शकतो’, अशी भीती व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ४ केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये जाणार !

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ४ केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला.

तुम्ही आमच्या समवेत आहात, हे सिद्ध करा !

आम्ही आमची भूमी आणि स्वातंत्र्य यांच्यासाठी लढत आहोेत. आमची सर्व शहरे अद्यापही अजेय आहेत. कुणीही ती भेदू शकणार नाहीत. आम्ही भक्कम आहोत. युक्रेनचे मनोबल खचलेले नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढू.

बांगलादेशातील वैद्यकीय महाविद्यालयात सर्व धर्माच्या विद्यार्थिनींसाठी हिजाब अनिवार्य !

कर्नाटकमधील हिजाबविरोधी आंदोलनांवरून भारतात अल्पसंख्यांचे धार्मिक अधिकार चिरडले जात असल्याची ओरड करणारे इस्लामी देश बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंच्या चिरडल्या जाणार्‍या धार्मिक अधिकारांविषयी चकार शब्दही काढत नाहीत !

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करा ! – युक्रेनच्या राजदूतांचे शिवभक्तांना आवाहन

‘युक्रेनमधील स्थिती सुधारावी, तेथील युद्ध समाप्त व्हावे’, असेच सहिष्णु भारतियांना वाटते. भारतातील शिवभक्तांना असे आवाहन करतांना युक्रेनच्या राजदूतांनी ‘युक्रेन नेहमीच भारताच्या विरोधात भूमिका का घेतो ?’, याचेही उत्तर द्यावे !

हरियाणामधील सोनिपत येथील खलिस्तानी आतंकवाद्यांच्या ३ हस्तकांना अटक

खलिस्तानी आतंकवाद समूळ नष्ट केला नाही, तर त्याचे पुढे परिणाम पूर्ण भारताला भोगावे लागतील. यासाठी सरकार पावले कधी उचलणार ?

हिंदु कुटुंबाला प्रलोभन दाखवून धर्मांतर केल्याच्या आरोपावरून ३ ख्रिस्त्यांना अटक

ख्रिस्ती धर्मप्रचारकांना कशाचेच भय न राहिल्यामुळे ते आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्यास धजावतात. अशांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !

कराड येथील कृष्णामाई घाटावर पू. विठ्ठलस्वामी यांना आढळून आली १८ व्या शतकातील गजलक्ष्मीची मूर्ती !

वडगाव येथील जयरामस्वामी मठाचे मठपती पू. विठ्ठलस्वामी वडगावर हे कराड येथील प्राचीन विष्णु-लक्ष्मी मंदिरामध्ये मूर्ती स्थापनेसाठी आले होते. कृष्णामाई घाटावर त्यांना एक पुरातन गजलक्ष्मीची मूर्ती आढळून आली.