राज ठाकरे यांना संभाजीनगर येथील सभेसाठी पुण्यातील पुरोहितांकडून आशीर्वाद !

रोहितांनी शंख वाजवून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही मंत्रांचे १५ मिनिटे पठण केले. वेदमंत्र पठण चालू असतांना राज ठाकरे यांनी महाआरती केली.

८ जून या दिवशी संभाजीनगर येथे त्याच जागी शिवसेनेची प्रत्युत्तर सभा !

‘भाजप आणि विरोधक यांच्यावर तुटून पडा’, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिल्या.

राज ठाकरे यांच्या सभेच्या सिद्धतेला वेग, मनसे शिष्टमंडळाची संभाजीनगर येथील पोलिसांशी चर्चा !

सभेसाठी १५ सहस्र लोकांची मर्यादा पाळणे कठिण ! – बाळा नांदगावकर, मनसे नेते

संभाजीनगर येथील राज ठाकरे यांची सभा रहित करण्यासाठीची याचिका १ लाख रुपयांचा दंड लावून फेटाळली !

‘रिपब्लिकन युवा मोर्चा’चे संभाजीनगर जिल्हाप्रमुख जयकिसन कांबळे यांच्या वतीने अधिवक्ता अजय कानवडे यांनी २९ एप्रिल या दिवशी ही याचिका प्रविष्ट केली होती.

जगभरात वर्ष २०२१ मध्ये २ लाख ५३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे जंगल नष्ट !

जगभरात वर्ष २०२१ मध्ये प्रत्येक मिनिटाला १० फुटबॉल मैदानाएवढे वनक्षेत्र नष्ट झाले. त्याचे क्षेत्रफळ २ लाख ५३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे म्हणजे उत्तरप्रदेश राज्याएवढे आहे.

‘बॉलिवूड’चे नाव पालटून ‘हिंदी चित्रपटसृष्टी’ करायचे आहे ! – अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी

मी ‘बॉलिवूड’मधील ३ गोष्टी पालटू इच्छितो. प्रथम मी ‘बॉलिवूड’चे नाव पालटून ‘हिंदी चित्रपटसृष्टी’, असे ठेवीन. दुसरे म्हणजे चित्रपटाच्या ‘सेट’वर रोमन लिपीमध्ये कलाकारांना संहिता (स्क्रिप्ट) दिली जात, मी ती संहिता देवनागरी लिपीमध्ये मागतो.

हवामान पालटामुळे वर्ष २०३० पासून प्रतिवर्षी करावा लागणार ५६० संकटांचा सामना ! – संयुक्त राष्ट्रे

हवामान पालट प्रदूषणामुळे निर्माण झाला असून हे प्रदूषण विज्ञानाच्या अतिरेकामुळे झाले आहे. गेल्या १०० वर्षांत विज्ञानाद्वारे बरीच प्रगती केल्याचे कितीही सांगितले जात असले, तरी ती प्रगती विनाशाला आमंत्रण देत आहे, हेच यातून लक्षात येते !

हिमालयातील ५१ शक्तिपीठांच्या संरक्षणासाठी याचिका प्रविष्ट !

हिमालयातील ५१ शक्तिपीठांच्या संरक्षणाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना नोटीस पाठवली आहे.

काशीला पोचल्यावर मला विलक्षण शांतीचा अनुभव आला ! – आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू ड्वाइट हॉवर्ड

अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू ड्वाइट हॉवर्ड शांतीच्या शोधात भारतात काशी यात्रेला आले आहेत. ‘काशीला पोचल्यावर मला विलक्षण शांतीचा अनुभव आला’, असे हॉवर्ड यांनी सांगितले.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) जाहरवीर बाबा मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची वारंवार तोडफोड होते, याचा अर्थ उत्तरप्रदेशात मूर्तीभंजक मोकाट आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलीस काय करत आहेत ?