धनंजय मुंडे यांनी ६ मुले आणि बायका लपवल्या आहेत ! – करुणा शर्मा  

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अनेक बायका आणि ६ मुले लपवली आहेत. त्यामुळे यापुढील काळात त्यांना कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी आवेदन दाखल करतांना तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत, अशी माहिती करुणा शर्मा यांनी दिली.

भारतात वायूप्रदूषण हा आरोग्यावर परिणाम करणारा दुसरा सर्वांत मोठा घटक ! – विदेशी आस्थापनाचा निष्कर्ष

यावर आजपर्यंत उपाय न काढणे, हे स्वातत्र्यानंतरच्या आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

हुकमिल लेन (मुंबई) येथील श्री शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी !

शिवजयंतीच्या माध्यमातून भावी पिढीमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या हुकमिल लेन (मुंबई) येथील श्री शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! सर्व उत्सव मंडळांनी यातून बोध घ्यावा !

आता मानसरोवर यात्रेला चीन किंवा नेपाळमधून जावे लागणार नाही ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

उत्तराखंडमधील पिथौरागढमार्गे थेट कैलास मानसरोवरपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवणार !

रशियाला शह देण्यासाठी ‘नाटो’ ४ तुकड्या पाठवणार

शिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धास प्रारंभ होऊन एक मास उलटला असून यासंदर्भात एक तातडीची बैठक घेण्यासाठी ‘नाटो’चे (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’चे) सर्व सदस्य देश बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे शिखर संमेलनाच्या निमित्ताने एकत्रित आले आहेत.

उत्तर कोरियाकडून १ सहस्र १०० किलोमीटर पल्ला गाठणार्‍या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी !

उत्तर कोरियाने वर्ष २०१७ नंतर प्रथमच ‘इंटरकॉन्टिनेन्टल (आंतरखंडीय) बॅलिस्टिक मिसाइल’ची चाचणी केल्याचा दावा दक्षिण कोरिया आणि जपान यांनी केला आहे.

मंदिरात येणारे व्हीआयपी लोक भक्तांना अडचणी निर्माण करत असतील, तर देव त्यांना क्षमा करणार नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? व्हीआयपी लोकांना आणि मंदिर प्रशासनाला का कळत नाही ?

(म्हणे) ‘आम्ही उत्तरदायी अण्वस्त्रधारी देश आहोत; मात्र आमच्यावरील आक्रमणास शक्तीनिशी उत्तर देऊ !’ – पाकचे राष्ट्रपती आरिफ अल्वी

पाकने त्याच्या संपूर्ण शक्तीचा वापर केला, तरी तो भारतासमोर टिकणार नाही, हे त्याने कायमच लक्षात ठेवायला हवे !

कोटकामते (जि. सिंधुदुर्ग) ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा नोंद

देवगड तालुक्यात शिक्षण विभागात झालेल्या लाखो रुपयांच्या घोटाळ्याच्या पाठोपाठ कोटकामते ग्रामपंचायतीमधील घोटाळा उघड होण्याची ही दुसरी घटना आहे.

श्रीलंकेकडून भारताच्या १६ मासेमारांना अटक !

सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप
भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, हे मासेमारांना लक्षात येण्यासाठी भारत सरकारने पाक आणि श्रीलंका यांच्या सागरी सीमेजवळ व्यवस्था करणे आवश्यक आहे.