देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील तत्त्वनिष्ठ आणि झोकून देऊन सेवा करणार्‍या पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी (वय ४४ वर्षे) यांच्या सन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

संतपद घोषित केल्यावर मला परात्पर गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अस्तित्व अनुभवता येत होते. – पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई  

अभिनेते योगेश सोमण यांचे १२ मार्चला ‘सावरकर : काल, आज आणि उद्या’यावर व्याख्यान !

हे व्याख्यान पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या राम गणेश गडकरी सभागृह येथे होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री. नितीन वाडीकर, उपाध्यक्ष श्री. श्रीरंग कुलकर्णी आणि कार्यवाह शालन शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 इतर मागासवर्गीय आयोगाची सर्वंकष माहिती गोळा करण्यासाठी सरकारकडून समिती स्थापन !

इतर मागासवर्गीय समाजाची सर्वंकष माहिती गोळा करण्याचे दायित्व यापूर्वी मागासवर्ग आयोगाकडे देण्यात आले होते; मात्र माहिती गोळा करण्यास होत असलेल्या विलंबामुळे माहिती गोळा करण्यासाठी सरकारने ५ जणांची समिती नेमली आहे.

मारियुपोल (युक्रेन) येथे अन्न-पाण्यासाठी नागरिकांकडून एकमेकांवर होत आहेत आक्रमणे !

भविष्यात येणार्‍या आत्पकाळात भारतात अशी स्थिती निर्माण झाल्यास जनता त्याला सामोरे जाण्यास सिद्ध आहेत का ?

(म्हणे) ‘भारताच्या सीमेतून पाकमध्ये क्षेपणास्त्र आले !’ – पाक सैन्याचा कांगावा

येनकेन प्रकारेण भारताला अपकीर्त करण्याची पाकची कुरापती वृत्ती जाणा !

रशियाकडून क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा : युक्रेनच्या राजधानीला दोन्ही बाजूंनी वेढा

युक्रेनने ब्रोवरीमध्ये रशियाला चोख प्रत्युत्तर देतांना रशियाचे ५ रणगाडे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. रशिया युक्रेनवर रणगाडे, ‘पॅराट्रूपर्स’, पायदळ, ‘अँटी-टँक गाईडेड मिसाईल्स’ आदी शस्त्रांद्वारे आक्रमण करत आहे.

भारताने ‘स्वतंत्र तिबेट’ला मान्यता द्यावी ! – तिबेटचे नागरिक

तिबेटवर चीनने आक्रमण केल्यावर भारताने त्याच्या विरोधात आवाज उठवला नाही. त्यामुळे चीन उद्दाम झाला. आता तो भारतीय सीमेतही घुसखोरी करत आहे. त्यामुळे आतातरी भारताने आक्रमक भूमिका घेऊन तिबेटला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

फिरोजपूर (पंजाब) येथील सीमेवर पाकमधून आलेला मोठा शस्त्रसाठा जप्त

पाकला नष्ट केल्याविना अशा घटना थांबणे अशक्य आहे, हे भारताने लक्षात घ्यावे !

निधीच्या उपलब्धतेनुसार अकोट (जिल्हा अकोला) ग्रामीण पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतीचे बांधकाम करणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

आमदार अमोल मिटकरी यांनी अकोट येथील ग्रामीण पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतीविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

विद्यार्थिनीने हिजाबच्या समर्थनार्थ ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटात पोस्ट केला पाकिस्तानी ध्वज !

सरकारने अशांना देशद्रोही घोषित करणारा कायदा करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे. तरच असे प्रकार थांबतील !