कुटुंबियांसाठी आधार बनलेल्या आणि ईश्वरावर श्रद्धा असणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा सामंत (वय ८४ वर्षे) !

श्रीमती सामंतआजी यांच्याकडे बघून त्या शिक्षिका वाटत नाहीत; कारण त्या शिकवण्याच्या भूमिकेत नसून सतत शिकण्याच्या स्थितीत (शिष्यभावात) असतात.

ध्यानावस्थेत जिवाच्या होत असलेल्या विविध प्रकारच्या स्थितीविषयी प.पू. दास महाराज यांनी सांगितलेली सूत्रे

ध्यान लागल्यावर जीव स्वतःला विसरतो. त्याला विदेही स्थिती येते आणि तो देवाशी एकरूप होऊ लागतो. त्याची भावसमाधी लागते.

काँग्रेसशासित छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी शेणापासून बनवलेल्या पेटीतून सादर केला अर्थसंकल्प !

अर्थसंकल्प मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेणापासून बनवलेल्या पेटीचा वापर करण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. ही पेटी रायपूर गोकुळ धाम गौठाणमध्ये कार्यरत ‘एक पहल’ या महिला बचत गटाच्या महिलांनी सिद्ध केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प पुतिन यांना घाबरत होते ! – ट्रम्प यांच्या माजी महिला सहकार्‍याचा दावा

ट्रम्प यांच्या माजी सहकारी स्टेफनी ग्रिशम या ट्रम्प यांच्या कार्यकाळात ‘व्हाईट हाऊस’च्या माध्यम सचिव होत्या.

गोव्यात सत्तास्थापनेसाठी मगोप आणि अपक्ष यांना समवेत घेणार ! – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ते पुढे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात मी नसतांनाही कामे झाली. भलेही थोड्याशा मतांनी विजयी झालो असलो, तरी माझ्या जिंकण्याचे संपूर्ण श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना, तसेच माझ्या पक्षाला जाते.

(म्हणे) ‘कट्टरतावादी हिंदु साधूची राजकीय शक्ती वाढली !’

हा ‘अल्-जजीरा’ वृत्तवाहिनीचा हिंदुद्वेष होय ! लोकनियुक्त नेत्याला अशा प्रकारे हीन लेखणे, हा लोकशाहीचा अवमान नव्हे का ? लोकशाहीप्रेमी याविषयी गप्प का ? अशा विद्वेषी वृत्तवाहिनीवर भारतात बंदीच घातली पाहिजे !

उत्तरप्रदेशमध्ये शिवसेनेला अपयश : एकही जागा जिंकता आली नाही !

शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्रातील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नेते संजय राऊत, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, तसेच अन्य नेते उत्तरप्रदेशात पक्षाच्या प्रचारासाठी गेले होते.

(म्हणे) ‘आता देशात संपूर्ण क्रांती आणायची आहे !’ – अरविंद केजरीवाल

पंजाबमधील खलिस्तानी आतंकवादाची पाळेमुळे ‘आप’ कशी खणून काढणार ?, हेहीे त्याने जनतेला सांगितले पाहिजे !

महाराष्ट्रातील ‘इक्रा आय.ए.एस्.’ संस्थेत मार्गदर्शन करणार्‍या प्राध्यापकाकडून ओसामा बिन लादेन याचे उदात्तीकरण !

‘इक्रा आय.ए.एस्.’सारख्या हिंदुद्वेषी संस्था बुद्धीभेद करत असल्यामुळे भारतीय प्रशासनात बहुतांश हिंदुद्वेष्ट्यांचा भरणा आहे, हे लक्षात घ्या ! अशांवर सरकारने त्वरित कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !