हिंदुत्वनिष्ठांनी पालिका आयुक्तांच्या चेहर्याला काळे फासले

दमोह (मध्यप्रदेश) – येथे २९ मार्चच्या सकाळी नगरपालिकेचे मुख्य आयुक्त प्रदीप शर्मा यांच्या चेहर्याला हिंदु संघटनांशी संबंधित युवकांनी काळी शाई फासली. शर्मा यांनी श्रीरामनवमी आणि चैत्र नवरात्री यांसाठी येथील चौकातील घंटा घरावर लावलेले भगवे झेंडे उतरवण्याचा आदेश दिला होता. यास हिंदु संघटनांनी विरोध केला.
पालिकेचे कर्मचारी झेंडे उतरवायला लागल्यावर हिंदु तरुण संतापले आणि त्यांनी कर्मचार्यांना थांबवले, तसेच येथे रस्ता बंद आंदोलन करून शर्मा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर माजी नगरसेवक विवेक अग्रवाल आणि छोटू यादव शर्मा यांच्या घरी पोचले अन् त्यांनी शर्मा यांच्या चेहर्याला काळे फासले.
या संपूर्ण प्रकरणाला जिल्हाधिकारी सुधीर कोचर यांनी ‘दुर्दैवी’ असे संबोधत घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला.