ऑस्ट्रेलियातील एका रुग्णालयात मुसलमान परिचारिकेचा दावा
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्यातील एका रुग्णालयात तैनात असलेल्या सराह अबू लेबेदा नावाच्या एका हिजाबधारी परिचारिकेने दावा केला आहे की, तिने इस्रायली रुग्णांना मारले आहे. यावर न्यू साउथ वेल्सच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की, तो परिचारिकेच्या दाव्याची चौकशी करेल. संबंधित रुग्णालयात रुग्णांच्या नोंदी देखील तपासल्या जातील. तथापि, रुग्णांना हानी पोचल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. सध्या या परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे. रुग्णालयाने तिचे नाव उघड करण्यात आलेले नसले, तरी अनेक ‘एक्स’वरील अनेक प्रथितयश खात्यांद्वारे ती मुसलमान असल्याचे सांगण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील ८५ टक्के ज्यू सिडनी आणि मेलबर्न शहरांमध्ये रहातात.
I have killed many Israeli patients! – Claims a Mu$!im nurse in Australia
A Mu$!im nurse’s claim in a hospital in Australia
If this claim is true, then it is a disgrace to humanity.
There are many such examples of a highly educated Mu$!im engineer or a doctor indulging in… pic.twitter.com/wyVe0MFbeA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 14, 2025
मॅक्स विफर नावाच्या एका प्रसिद्ध इस्रायली मुलाखतकाराने सिडनीतील बँक्सटाऊन रुग्णालयाचे अहमद राशद नादीर (पुरुष) आणि सराह अबू लेबेदा (महिला) या दोन परिचारकांची मुलाखत घेतांना सराह अबू लेबेदा या परिचारिकेने वरील दावा केला. त्याचा व्हिडिओ जगभरात सर्वत्र प्रसारित होत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या एका वर्षापासून वाढता ज्यूविरोध
ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या एका वर्षापेक्षा अधिक काळापासून ज्यूविरोधी भावना वाढली आहे. ज्यूंची घरे, कार्यालये आणि आस्थापने यांची तोडफोड करण्यात आली आहे. एक शाळा आणि दोन सिनेगॉग (ज्यूंचे धार्मिक स्थान) यांना आग लावण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील एका ज्यू संघटनेचे अधिकारी अॅलेक्स रिव्हचिन यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाच्या वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये ज्यू समुदायाबद्दल द्वेष वाढत आहे.
ज्यूविरोधी गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी पोलीस पथकाची स्थापना
न्यू साउथ वेल्स राज्याचे आरोग्यमंत्री रायन पार्क म्हणाले की, वर्ष २०२३ मध्ये इस्रायल-हमास युद्ध चालू झाल्यापासून सिडनीमध्ये विशेषतः ज्यूविरोधी गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक ऑनलाइन व्हिडिओंशी संबंधित गुन्ह्यांचे अन्वेषण करते, ज्यामध्ये द्वेषयुक्त भाषण कायद्यांचे उल्लंघन समाविष्ट आहे.
संपादकीय भूमिका
|