गोळीबारकर्त्याचा अधिवक्ता घेण्यास नकार; स्वतःच युक्तीवाद करणार

येथील २ मशिदींमध्ये गोळीबार करून ५० जणांना ठार करणारा ब्रेन्टेट टॅरॅन्ट याने खटला लढवण्यासाठी अधिवक्ता घेण्यास नकार दिला असून तो स्वतःच युक्तीवाद करणार असल्याचे सांगितले आहे. न्यायालयाने त्याला अधिवक्ता दिला होता….

टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी न्यूझीलंडमधील गोळीबारावर दुःख व्यक्त करणारे ट्वीट केल्यावर लोकांचा ‘पुलवामा येथील आक्रमणाचा निषेध का केला नाही’, असा प्रश्‍न !

धर्मबांधवांवर झालेल्या गोळीबारानंतर सानिया मिर्झा यांना दुःख होते आणि ते त्या व्यक्त करतात; मात्र ‘भारतीय सुरक्षादलांवरील आक्रमणाचे दुःख का व्यक्त केले नाही’, असे विचारल्यावर थातूरमातूर उत्तर देऊन त्या गप्प बसतात ! यातून त्यांची खरी मानसिकता समजते !

न्यूझीलंडमध्ये २ मशिदींमधील गोळीबारात ४९ जण ठार

येथील २ मशिदींमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात ४९ जण ठार झाले, तर २० जण गंभीररित्या घायाळ झाल्याची घटना १५ मार्च या दिवशी घडली.

न्यूझीलंडमध्ये ‘सुपरमार्केट’च्या चुकीमुळे गोमांस खावे लागल्याने शुद्धीकरणयात्रेचा खर्च देण्याची हिंदूची मागणी

कुठे चुकून गोमांस भक्षण करावे लागल्याने संबंधितांकडे शुद्धीकरणाचा खर्च मागणारे विदेशातील धर्माचरणी हिंदू, तर कुठे स्वतःहून गोमांस भक्षण करून वर त्याची बढाई मारणारे भारतातील धर्मद्रोही हिंदू !

ऑस्ट्रेलियाच्या दोषी कार्डिनलवर आणखी एक लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंद

वर्ष १९९० मध्ये लहान मुलांचे लैंगिक शोेषण केल्यावरून दोषी ठरवण्यात आलेले ऑस्ट्रेलियाचे कार्डिनल जॉर्ज पेल यांच्यावर वर्ष १९७० मध्ये २ लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणावरून नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या ऑस्ट्रेलियातील बिशपला एक वर्षाची शिक्षा

ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेडचे आर्चबिशप फिलिप विल्सन यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी येथील न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

न्यूझीलंडमधील पाद्री होपफूल ग्लोरियावेल हे महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे उघड

न्यूझीलंडमध्ये होपफूल ग्लोरियावेल नावाचे पाद्री वर्ष १९६९ पासून एक धार्मिक संस्था चालवत होते. त्यांचा नुकताच मृत्यू झाला. यानंतर अनेक महिलांनी त्यांच्याविषयीचे वाईट अनुभव उघड केले आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये ४ सहस्रांहून अधिक संस्थांमध्ये बालकांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप

देशातील अनेक संस्था ६ दशकांपासून लहान मुलांची देखभाल करण्यास अपयशी ठरल्या आहेत आणि सहस्रो मुले लैंगिक शोषणाला बळी पडली आहेत.

महिलांनी हिजाब परिधान केल्यास पुरुष स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात ! – ऑस्ट्रेलियातील इमाम

पुरुषांनी स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम झाले पाहिजे; कारण प्रत्यक्षात आता तसे होत नाही. यामुळेच महिलांनी हिजाब परिधान करणे आवश्यक आहे, असे विधान ऑस्ट्रेलियातील इमाम शेख जैन्नादीन जॉनसन यांनी केले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन मागे घेण्यास आस्थापन आणि अ‍ॅडव्हर्टायझिंंग स्टॅण्डडर्स ब्यूरो यांचा नकार

ऑस्ट्रेलियामध्ये ‘मीट अँड लाइव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने ४ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या एका विज्ञापनामध्ये श्री गणेश कोकराचे मटण खात असल्याचे दाखवले होते.


Multi Language |Offline reading | PDF