Phone Light Harm Skin : भ्रमणभाषच्‍या निळ्‍या प्रकाशामुळे त्‍वचेची होते हानी !

ऑस्‍ट्रेलियातील बाँड विद्यापिठाच्‍या अभ्‍यासाचा निष्‍कर्ष

कॅनबेरा (ऑस्‍ट्रेलिया) – ऑस्‍ट्रेलियाच्‍या बाँड युनिव्‍हर्सिटीतील त्‍वचेशी संबंधित परिस्‍थितीचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. मायकेल फ्रीमन यांनी अभ्‍यासात एक दावा केला आहे की, भ्रमणभाषमधून निघणारा निळा प्रकाश इतका धोकादायक असतो की, त्‍यात त्‍वचेचा रंग फिका करण्‍याची क्षमता असते. यामुळे त्‍वचेची मोठी हानी होते.

अभ्‍यासात लक्षात आले की,

१. निळा प्रकाश हा डोळ्‍यांना दिसणार्‍या प्रकाशाचा भाग आहे. सूर्यप्रकाश हा त्‍याचा सर्वांत भक्‍कम स्रोत आहे. त्‍यात लाल-पिवळ्‍या प्रकाशापेक्षा अधिक ऊर्जा असते. भ्रमणभाष, लॅपटॉप आणि टीव्‍ही यांसारखी इलेक्‍ट्रॉनिक उपकरणेदेखील निळा प्रकाश उत्‍सर्जित करतात. तथापि ते १०० ते १ सहस्र पट खालच्‍या स्‍तरावर होते. आपण ही उपकरणे वापरण्‍यात बराच वेळ घालवतो, त्‍यामुळे या प्रकाशाचा आपले आरोग्‍य, डोळे आणि झोप यांवरही परिणाम होतो.

२. निळ्‍या प्रकाशाच्‍या प्रदर्शनामुळे मेलेनिनचे उत्‍पादन वाढू शकते. हे नैसर्गिक रंगद्रव्‍य आहे, जे त्‍वचेला रंग देते. त्‍यामुळे अधिक निळ्‍या प्रकाशामुळे त्‍वचेचा रंग अधिक गडद होण्‍याचा धोका वाढवतो. मेलेनिनचे अधिक उत्‍पादन त्‍वचेवर गडद डाग निर्माण करू शकतोे. विशेषतः गडद त्‍वचा असलेल्‍या लोकांमध्‍ये डाग निर्माण होऊ शकतात.