Blood Written Letter To Yogiji : मुसलमान प्रसादात थुंकू शकत असल्याने त्यांना चैत्र नवरात्रीत दुकाने थाटण्यावर बंदी घाला !

हिंदुत्वनिष्ठ नेते दिनेश शर्मा फलाहारी यांची उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे रक्ताने पत्र लिहून मागणी

हिंदुत्वनिष्ठ नेते दिनेश शर्मा फलाहारी (डावीकडे), त्यांनी रक्ताने लिहिलेले पत्र (मध्यभागी) व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (उजवीकडे)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – चैत्र नवरात्रीला प्रारंभ झाला असतांना २८ मार्च या दिवशी हिंदुत्वनिष्ठ नेते दिनेश शर्मा फलाहारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहून नवरात्रीच्या कालावदीत मुसलमानांची दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली आहे.

फलाहारी पुढे म्हणाले की, मुसलमान लोक मंदिरांभोवती दुकाने उभारतात आणि मनगटावर लाल दोरा बांधतात. ते प्रसादात थुंकतात आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देतात. ते हिंदूंच्या पवित्र धर्माचा द्वेष करतात, सणांचा द्वेष करतात, हिंदूंचा द्वेष करतात. म्हणून आम्ही हिंदुहृदयसम्राट योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की, त्यांनी मुसलमानांना नवरात्रीच्या उत्सवापासून ९ दिवस दूर ठेवावे.

संपादकीय भूमिका

नुकत्याच झालेल्या महाकुंभपर्वाच्या ठिकाणी अशाच प्रकारची बंदी प्रशासनाकडून घालण्यात आली होती, त्यामुळे सरकारला हे अशक्य नाही !