Pakistan Army : पाकिस्तानी सैन्याकडून आतंकवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईच्या वेळी १० नागरिकही ठार !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सैन्याने आतंकवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईत १२ आतंकवादी ठार झाले, तर पाकच्याच १० नागरिकांचाही मृत्यू झाला. मृत नागरिकांमध्ये काही मुले आणि महिला यांचा समावेश आहे.

या संदर्भात पाकिस्तान सरकारने स्पष्टीकरण देतांना सांगितले की, कारवाई करण्यात आलेला परिसर फारच गुंतागुंतीचा होता. येथे आतंकवादी अजूनही नागरी वस्त्यांत लपलेले आहेत. त्याचबरोबर ही मोहीम घाईघाईत चालवली जात असल्याने अशा चुका होतात. आक्रमणात घायाळ झालेल्या नागरिकांना वैद्यकीय साहाय्य केले  जाईल आणि पीडित कुटुंबांना भरपाई दिली जाईल.

संपादकीय भूमिका

पाक सैन्याने आतंकवाद्यांच्या माध्यमांतून भारतातील निरपराध लोकांना मारले आता ते स्वतःच स्वतःच्या नागरिकांना मारत आहेत, हे त्यांच्या कर्माचे फळ म्हणावे लागेल  !