दूध विक्रीतून केवळ २०० कोटी रुपयांची कमाई !
नवी देहली – देहली राज्याच्या वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात दारूच्या विक्रीवरील उत्पादन शुल्क आणि व्हॅट (मूल्यवर्धित कर) यांमधून ५ सहस्र ६८ कोटी ९२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्याच वेळी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांवरील जीएस्टीमधून (सेवा आणि कर यांमधून) २०९ कोटी ९० लाख रुपयांचा महसूल मिळाल्याचे सरकारने म्हटले आहे. हे दोन्ही आकडे फेब्रुवारीपर्यंतचे आहेत. देहली विधानसभेत भाजपचे आमदार अभय वर्मा यांनी विचारलेल्या प्रश्नावर सरकारने ही माहिती दिली.
भाजपकडून आम आदमी पक्षावर मद्य धोरण घोटाळ्यावरून आरोप केले जात असतांना ही आकडेवारी समोर आली आहे. आपचे नेते आणि देहलीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, हे या मद्य घोटाळा प्रकरणात कारागृहात जाऊन आले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या देहली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव होण्याचे हे एक मोठे कारण आहे.
देहलीत प्रतिदिन ५ लाख ८२ सहस्र लिटर मद्याची होते विक्री !
देहलीत २०२३-२४ या वर्षामध्ये २१ कोटी २७ लाख लिटर मद्य विक्री झाली, म्हणजचे प्रतिदिन अनुमाने ५ लाख ८२ सहस्र लिटर विक्री झाली. वर्ष २०२२-२३ मध्ये हा आकडा २५ लाख ८४ सहस्र लिटर इतका होता.
वर्ष २०२४-२५ मध्ये २१० कोटी रुपयांच्या तुलनेत सरकारने वर्ष २०२३-२४ मध्ये दुधाच्या विक्रीतून अनुमाने ३०० कोटी रुपये आणि वर्ष २०२२-२३ मध्ये ३६५ कोटी रुपये कमावले होते.
संपादकीय भूमिकाही आकडेवारी केवळ देहली राज्याची असली, तर संपूर्ण देशाचा आढावा घेतला, तर दुधापेक्षा मद्याच्याच विक्रीची आकडेवारी अधिक असणार, यात शंका नाही. यातून भारत कोणत्या स्थितीला गेला आहे ? आणि त्याचे पुढे काय होणार आहे ? हे लक्षात येते ! |