Murshidabad Muslims Attack On Hindus : मुर्शिदाबाद (बंगाल) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंची घरे, दुकाने आणि शेत यांची जाळपोळ !

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील मालदा येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या मिरवणुकीवर आक्रमण केल्यानंतर आता मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदूंमध्ये दहशत निर्माण केली आहे. भाजपने या संदर्भातील काही व्हिडिओ प्रसारित केले आहेत. यात धर्मांध मुसलमान निवडकपणे हिंदूंची घरे, दुकाने आणि शेत यांच्यावर आक्रमण करून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.

१. २९ मार्चला मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदा पोलीस स्टेशन सीमेतील झौबोना गावात रात्री उशिरा मुसलमानांनी हिंदूंच्या दुकानांना आणि शेतांना लक्ष्य केले. या घटनेमुळे परिसरात तणाव वाढला आहे.

२. केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष डॉ. सुकांता मजुमदार यांनी दावा केला की, झौबोना गावात मुसलमानांच्या जमावाने हिंदूंच्या दुकानांची लूट केली. त्यांना आग लावण्यात आली. अंधाराचा अपलाभ घेत हिंदु शेतकर्‍यांच्या शेत जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

३. भाजपचे आमदार शुभेंदू अधिकारी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, बंगालमध्ये हिंदूंवरील आक्रमणे सतत वाढत आहेत. ममता बॅनर्जी सरकार आणि तृणमूल काँग्रेस लांगूलचालनाचे राजकारण करत आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील हिंदूंप्रमाणेच भारतातील बंगाल राज्यातील हिंदूंची स्थिती झाली आहे. याविषयी ना केंद्र सरकार काही करत आहे, ना राज्य सरकार ! हे त्यांना निवडून देणार्‍या हिंदूंना लज्जास्पद होय !